AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गंधकाचे महत्व व कार्य
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
गंधकाचे महत्व व कार्य
गंधक हे पिकांच्या वाढीसाठी लागणारे आवश्यक मूलद्रव्ये आहे. गंधक हे पिकामध्ये तेलनिर्मिती तसेच हरितद्रव्य तयार करण्यासाठी गंधक हे महत्वाचे कार्य करते. गंधकाचे महत्व १)गंधकाच्या वापरामुळे उत्पादनात वाढ होते. २)गंधकाच्या वापरामुळे पिकांच्या उत्पादकता व गुणवत्तेत वाढ होते. ३)गंधक नत्राची कार्यक्षमता व उपलब्धता वाढवते. ४) गंधकाला भूसुधारक असे म्हणतात कारण गंधक मातीचा सामू कमी करण्याचे काम करतो चुनखडी युक्त चोपण जमिनीत त्याचा वापर महत्वाचा ठरतो. ५)महत्वाचे म्हणजे गळीत धान्यामध्ये प्रथिने व तेलाचे प्रमाण वाढवण्यासाठी गंधकाचा उपयोग केला जातो.
गंधकाचे कार्य – १)गंधक हे वनस्पतीच्या पानांमधील हरितद्रव्य वाढवण्यास मदत करते.त्यामुळे पिकांच्या अन्ननिर्मितीला चालना मिळते. २)गंधक द्विदल कडधान्य पिकांच्या मुळावरील गाठीमध्ये वाढ होण्यास व जीवाणुद्वारे नत्र स्थिर करण्यास मदत करते. ३) वनस्पतीच्या निरनिराळ्या विकारांच्या व चयापचानाच्या क्रियेत मदत करते. ४)फळे तयार होण्याच्या कालावधीत गंधकाची अत्यंत आवश्यकता असते. गंधकाच्या कमतरतेमुळे पिकांमध्ये आढळून येणारे लक्षणे १) गंधकाच्या कमतरतेमुळे पिकांची पाने पिवळी पडतात. २) फळे पिवळसर हिरवी दिसतात त्यांची वाढ कमी होते रंग बदलतो व आतील गर कमी होतो. ३) नवीन येणारी पाने व पालवी पिवळी पडु लागते. देठ बारीक व आखूड राहतात. ४) द्विदल पिकांच्या मुळांवरील नत्र स्थिरीकरणाच्या गाठीचे प्रमाण कमी होते. ५) गंधकाच्या कमतरतेमुळे प्रथिने व तेलाचे प्रमाण घटते. अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर एक्सिलेंस २८ जून १८
578
0