AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
खूशखबर ! 'या' व्यक्तींना सरकार देणार महिन्याला 3000 रुपये, अशी करा नोंदणी!
कृषि वार्तासकाळ
खूशखबर ! 'या' व्यक्तींना सरकार देणार महिन्याला 3000 रुपये, अशी करा नोंदणी!
👉पुन्हा एकदा गरीब आणि ज्येष्ठ व्यक्तींना समोर ठेवून मोदी सरकारने मोठी घोषणा केली आहे. मोदी सरकारने अशा व्यक्तींसाठी दर महिन्याला ३००० रुपये देण्याची घोषणा केली आहे. 👉या योजनेसाठी आतापर्यंत सुमारे ४५ लाख लोकांनी नोंदणी ही केली आहे. केंद्र सरकारने अशा व्यक्तींसाठी प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेची सुरुवात केली आहे. 👉यामध्ये असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या श्रमिकांना वयाची ६० वर्षे पूर्ण केल्यानंतर दरमहा ३००० रुपये किमान पेन्शन दिली जाईल. सरकारने २०१९ मध्ये प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना (PM-SYM) सुरु केली होती. 👉या योजनेअंतर्गत ४ मार्च २०२१ पर्यंत सुमारे ४४.९० लाख श्रमिकांनी आपली नोंदणी केली आहे. या योजनेत १८-४० वर्षांच्या समूहाचे असे श्रमिक सहभागी होऊ शकतात, ज्यांचे मासिक उत्पन्न १५ हजार रुपयांपेक्षा कमी आहे. किती मिळेल पेन्शन 👉PM-SYM योजनेअंतर्गत ५५ रुपये ते २०० रुपये महिना गुंतवणूक केली जाऊ शकते. यामध्ये १८ वर्षाच्या व्यक्तींना महिना ५५ रुपये आणि ३० वर्षांच्या व्यक्तीला १०० रुपये तर ४० वर्षीय व्यक्तीला २०० रुपये महिना भरावे लागतील. 👉 जर एखाद्या श्रमिकाने १८ व्या वर्षी PM-SYM योजनेत आपली नोंदणी केली तर त्याला एका वर्षाला केवळ ६६० रुपये जमा करावे लागतील. या श्रमिकाला ६० व्या वर्षापर्यंत २७,७२० रुपये गुंतवावे लागतील. श्रमिकाला ४२ वर्षांपर्यंत पैसे गुंतवावे लागतील. 👉६० वर्षे झाल्यानंतर त्याला दरमहा ३००० रुपये मिळतील. भारतीय जीवन विमा निगमच्या (LIC) माध्यमातून ही योजना चालवली जात आहे. त्यामुळे पेन्शनही एलआयसीकडून दिली जाईल. अशी करा नोंदणी 👉प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन पेन्शन योजनेत नाव नोंदवण्यासाठी श्रमिकांना आधार कार्ड, बँक खात्याचे पासबुक घेऊन कॉमन सर्व्हिस सेंटरला जाऊन खाते सुरु करावे लागेल. खाते सुरु केल्यानंतर श्रमिकांना श्रम योगी कार्ड जारी केले जाईल. 👉या योजनेबाबत अधिक माहितीसाठी 1800-267-६८८८ या हेल्पलाइनवर संपर्क साधता येईल. संदर्भ -सकाळ, यासारख्या अधिक महत्वाच्या व कृषी विषयक घडामोडी जाणून घेत रहा व माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया खाली कंमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा.
93
5
इतर लेख