AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
खुशखबर...! खरिपासाठी ५० हजार क्विंटल बियाण्यांचा पुरवठा !
कृषी वार्ताAgrostar
खुशखबर...! खरिपासाठी ५० हजार क्विंटल बियाण्यांचा पुरवठा !
➡️खरीप हंगामासाठी कृषी विभागाकडून बियाण्याचा पुरवठा सुरू करण्यात आला आहे. यंदा महसूलच्या पुणे विभागातून मागणी केलेल्या एक लाख ६८ हजार ९५० क्विटंल बियाण्यांपैकी ४९ हजार ४२७ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा झाला आहे. गावपातळीवर कृषी सेवा केंद्राकडून हे बियाणे शेतकऱ्यांना देण्यात येत आहे, असे महसूलच्या पुणे विभागाच्या कार्यालयातील सूत्रांनी सांगितले. ➡️सध्या विभागातील बहुतांशी भागात उन्हाळी हंगामातील पिकांची काढणी वेगाने सुरू आहे. ज्या शेतकऱ्यांनी उन्हाळी हंगामातील पिके घेतलेली नाहीत, अशा शेतकऱ्यांनी खरिपाची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी जून च्या पहिल्या आठवड्यापासून पूर्व मशागतीवर शेतकरी भर देऊ लागले आहेत. नांगरटी करण्यावर भर देत शेत पेरणीसाठी तयार केली आहे. जूनच्या पहिल्या पंधरवड्यात चांगला पाऊस झाल्यास शेतकऱ्यांना पेरणी करता येईल. शेतकऱ्यांना खतांच्या व बियाण्यांच्या बाबतीत काही अडचणी आल्यास संबंधित तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आलेआहे. ➡️यंदा चांगल्या पावसामुळे खरिपाचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज गृहीत धरून कृषी विभागाने १५ हजार ९९७ क्विंटलने अधिक वाढ करीत जवळपास एक लाख ६८ हजार ९५० क्विंटल बियाण्याला मंजुरी दिली आहे. यामध्ये महाबीज एनएससीकडून २२ हजार २५४ क्विंटल, तर उर्वरित खासगी कंपन्यांकडून बियाण्यांचा पुरवठा अपेक्षित आहे. ➡️जिल्हानिहाय बियाण्यांची मागणी, झालेला पुरवठा (क्विंटलमध्ये) कोल्हापूर --- ३९,९७१ --- ८७९५ सांगली ---३८१४० ---७२९४ सातारा ---४४१७२ --- ६५६३ पुणे ---२९५६७ ---१६७२५ सोलापूर ---१७१०० ---१००५० एकूण ---१,६८,९५० ---४९,४२७ ➡️संदर्भ: Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
25
1
इतर लेख