AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
खरीप वाटाणा पेरणी विषयक माहिती!
आजचा सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
खरीप वाटाणा पेरणी विषयक माहिती!
खरीप वाटाणा पेरणी विषयक माहिती - खरिफ वाटाण्याची पेरणी जुन ते ऑगस्ट महिन्यापर्यंत सरी वरंभा करून करावी. पेरणीसाठी २ ओळींमधील अंतर ४५ सेंमी आणि २ रोपांमधील अंतर १० ते २० सेंमी ठेवावे. तसेच पेरणी साठी एकरी १५ ते २० किलो बियाणे वापरावे. सुरुवातीच्या काळात पिकाच्या चांगल्या वाढीसाठी आणि बुरशीजन्य रोगांचा आणि किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी डीएपी ५० किलो, पोटॅश २५ किलो,कार्बोफ्युरॉन ५ किलो आणि कार्बेन्डाझिम घटक असलेले बुरशीनाशक ५०० ग्रॅम प्रति एकर जमिनीतून फोकून द्यावे.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
153
1