AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
खतांची गुणवत्ता कशी ओळखाल?
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
खतांची गुणवत्ता कशी ओळखाल?
मुख्यतः नत्राचा पुरवठा करण्यासाठी युरिया, स्फुरदचा पुरवठा करण्यासाठी डीएपी, एसएसपी किंवा एनपीके आणि पालाशचा पुरवठा करण्यासाठी एमओपी किंवा एनपीके चा वापर केला जातो. तसेच जस्त चा पुरवठा करण्यासाठी झिंक सल्फेटचा वापर केला जातो. खतांची गुणवत्ता खालीलप्रमाणे तपासली जाऊ शकते. यूरिया: UREA हा पांढरा रंगाचा चमकदार असतो, यात सामान आकाराचे गोल दाणे असतात. हा पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळतो, पाण्यात विरघळलेल्या द्रावणाला स्पर्श केल्यास थंड लागते, युरियाचे दाणे उन्हात जमिनीवर ठेवल्यास ते वितळते आणि जास्त उन्हात युरियाचे कोणतेही अवशेष राहत नाहीत. डीएपी: DAP डीएपीचे दाणे कठोर, भुरे, काळे किंवा बदामी रंगाचे असतात. डी.ए.पी ची गुणवत्ता ओळखण्यासाठी काही दाण्यांना हातात घेऊन त्यात थोडा चुना मिसळून तंबाकू सारखे रगडल्यावर तीव्र गंध तयार होतो. ज्याचा वास घेणे खूप कठीण असते. याव्यतिरिक्त डीएपीच्या काही दाण्यांना फरशीवर रगडल्यावर ते तुटत नाहीत. जर डीएपीच्या दाण्यांना तव्यावर हळुवार गरम केले असता त्याचे दाणे फुगतात. एसएसपी: SSP एसएसपीचे दाणे कठोर, दाणेदार, भुरे, काळे आणि बदामी रंगाचे असतात. हे खत पावडरच्या स्वरूपात देखील उपलब्ध असते. एसएसपी या दाणेदार खताचा मुख्यतः डी.ए.पी. आणि एन.पी.के. या मिश्र खतांसारखाच वापर केला जातो. एमओपी: MOP एमओपी हे सफेद, पांढर्‍या रंगाच्या मिठासारखे आणि लाल मिरचीच्या मिश्रणासारखे असते. याचे दाणे ओलसर केल्यावर एकमेकांना चिटकत नाहीत. हे खत पाण्यात विरघळल्यावर या खताचा लाल भाग पाण्याच्यावर तरंगतो. झिंक सल्फेट: Zinc sulphate झिंक सल्फेट या खतात मॅग्नेशियम सल्फेटचे प्रमुख मिश्रण असते. भौतिक रूप समानतेमुळे या खताची नकली असली ची ओळख करणे खूप कठीण असते. या खताच्या गुणवत्ता तपासण्यासाठी याच्या मिश्रणात डी.ए.पी चे मिश्रण मिळविल्यावर दाट द्रावण तयार होते. मॅग्नेशियम सल्फेट सोबत असे होत नाही. याशिवाय, झिंक सल्फेटच्या मिश्रणात पातळ दाहक सोडा मिसळल्यावर पांढरे, फिकट तपकिरी द्रावण तयार होते. यात घट्ट दाहक मिसळल्यावर द्रावण पूर्णपणे मिसळून जाते. जर झिंक सल्फेटचच्या ऐवजी मॅग्नेशिम सल्फेट घेतले तर द्रावण विरघळत नाही. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
24
15