AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कोरोना काळात मिळेल 10 लाखांपर्यंतचा ‘विवाह विमा’!
समाचार न्यूज १८ लोकमत
कोरोना काळात मिळेल 10 लाखांपर्यंतचा ‘विवाह विमा’!
➡️गेल्या दोन वर्षांमध्ये, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे कित्येक जणांची लग्नं रद्द झाली आहेत, किंवा पुढे ढकलावी लागली. अशा वेळी मग बऱ्याच लोकांचा लग्नासाठी हॉल बुक करणे, केटरिंग किंवा फोटोग्राफरला दिलेला ॲडव्हान्स अशा गोष्टींवर केलेला खर्च पूर्णपणे वाया गेला. ➡️येत्या वर्षात (२०२२) जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांमध्ये लग्नाचे अनेक मुहूर्त आहेत. मात्र, पुन्हा एकदा कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे लॉकडाऊन लागण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. अशा वेळी पूर्ण खर्च वाया जाण्याची शक्यता आहे. असं होऊ नये यासाठी एक भन्नाट उपाय उपलब्ध आहे. तो म्हणजे, विवाहाचा विमा! ➡️ऐकायला वेगळं वाटत असलं, तरी वेडिंग इन्शुरन्स हा अगदी महत्त्वाचा आहे. ऐनवेळी लग्न रद्द झाल्यास, लग्नासाठी केलेल्या खर्चाची बरीच रक्कम तुम्हाला या विम्याच्या मदतीने कव्हर करता येते. यामध्ये चार प्रकारची कव्हर उपलब्ध आहेत. 1. देणेकऱ्यांचं कव्हर : विवाह रद्द झाल्यास या कव्हरमध्ये तिसऱ्या पक्षाचे, म्हणजेच थर्ड पार्टीचे नुकसान वाचवले जाते. अपघातामुळे विवाह रद्द झाल्यास हा क्लेम करता येतो. 2. कॅन्सलेशन कव्हरेज : अचानक आणि अस्पष्ट कारणांमुळे विवाह रद्द झाल्यास या कव्हरच्या माध्यमातून क्लेम करता येतो. 3. संपत्ती नुकसान : विवाह सोहळ्यादरम्यान काही अपघात झाल्यामुळे संपत्तीला होणाऱ्या नुकसानासाठी या माध्यमातून क्लेम करता येतो. 4. दुर्घटना : अपघातामुळे नवरदेव वा वधू जखमी झाल्यास, त्यांचा रुग्णालयातील खर्च यातून कव्हर केला जातो. काय काय होतं कव्हर? विवाह विमा हा लग्नासाठी केलेला जवळपास सगळाच खर्च परत मिळवून देऊ शकतो. यामध्ये मग केटरिंग ॲडव्हान्स, हॉल ॲडव्हान्स, ट्रॅव्हल एजन्सींना दिलेला ॲडव्हान्स, हॉटेलच्या रुम्स बुक करण्यासाठी दिलेला ॲडव्हान्स, लग्नाचा सेट उभारण्यासाठी केलेला खर्च, पत्रिका छापण्यासाठी केलेला खर्च, तसेच संगीत समारंभ वा सजावटीसाठी दिलेला ॲडव्हान्स अशा सर्व प्रकारच्या खर्चाची रक्कम तुम्हाला परत मिळू शकते. किती असतो प्रीमियम? तुम्ही किती रुपयांचा विमा घेत आहात यानुसार तुमचा प्रीमियम ठरतो. जर तुम्ही १० लाख रुपयांचा विवाह विमा घेतला आहे, तर तुम्हाला ७,५०० ते १५,००० रुपयांचा प्रीमियम द्यावा लागतो. म्हणजेच, एकूण रकमेच्या ०.७ ते २ टक्के एवढाच प्रीमियम तुम्हाला भरावा लागतो. ➡️इतर गोष्टींमुळे विवाह रद्द झाल्यास तुम्हाला तातडीने त्याबाबत विमा कंपनीला कळवावं लागतं. यानंतर विमा कंपनीचे अधिकारी माहितीची पडताळणी करतात. जर योग्य त्या कारणामुळे विवाह रद्द झाला असेल, तर झालेल्या नुकसानाची भरपाई कंपनीकडून तुम्हाला दिली जाते. ➡️म्हणून भविष्यातील होणारे नुकसान टाळण्यासाठी आधीच खबरदारी घेणं कधीही चांगलं. त्यामुळे तुम्हीही पुढील वर्षी लग्नाचा बार उडवायचा विचार करत असाल; तर आधी विवाह विमा नक्कीच घ्या! संदर्भ:-न्यूज १८ लोकमत, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
17
9
इतर लेख