AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
केळी पिकासाठी आवश्यक आंतरमशागत!
गुरु ज्ञानAgroStar
केळी पिकासाठी आवश्यक आंतरमशागत!
👉केळी पिकाच्या जोमदार वाढीसाठी आणि चांगल्या उत्पादनासाठी योग्य आंतरमशागत करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सुरुवातीपासून पिकात कोळपणी आणि खुरपणी करून जमिन स्वच्छ व भुसभुशीत ठेवणे गरजेचे आहे. यामुळे जमिनीत ऑक्सिजनची उपलब्धता वाढते आणि झाडांच्या मुळांना पोषक तत्त्वांचा योग्य प्रकारे पुरवठा होतो. 👉केळीच्या झाडाच्या बुंध्याजवळ येणारी पिले किंवा सकर लवकरात लवकर काढून टाकावीत, विशेषतः झाडाला फुल येण्याच्या आधीच. यामुळे सकरची मुख्य झाडासोबत होणारी अन्नद्रव्ये, पाणी आणि इतर पोषक तत्त्वांची स्पर्धा कमी होईल. परिणामी, मुख्य झाडाला योग्य प्रमाणात पोषण मिळते आणि त्याचा विकास अधिक चांगल्या प्रकारे होतो. 👉केळीच्या घडाची गुणवत्ता राखण्यासाठी, घड निसवल्यानंतर गरज पडल्यास झाडांना आधार देणे महत्त्वाचे आहे. जोरदार वाऱ्यामुळे झाडे कोसळण्याचा धोका टाळण्यासाठी तसेच पिकांची योग्य वाढ सुनिश्चित करण्यासाठी हे पाऊल उचलावे. नियमित आंतरमशागत आणि योग्य काळजी घेतल्यास केळीच्या उत्पादनात वाढ होऊ शकते आणि पिकाची गुणवत्ता सुधारू शकते. 👉स्रोत:- AgroStar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
8
0
इतर लेख