गुरु ज्ञानAgrostar
केळी घडाची गुणवत्ता वाढवण्यासाठी उपाय
👉घड पूर्ण निसवल्यानंतर केळफूल वेळीच कापणे महत्त्वाचे आहे. घडावर 8 ते 9 फण्या ठेवून उर्वरित खालच्या फण्या धारदार विळीने सुरुवातीला कापून टाकाव्यात. यामुळे फळांचे आकारमान सुधारते आणि घड लवकर परिपक्व होतो. तसेच, फण्यांची योग्य वेळी विरळणी करणे उत्पादनाच्या दर्जासाठी अत्यावश्यक आहे.
👉फुलकिडी या कीडीच्या नियंत्रणासाठी केळफूल बाहेर पडतेवेळी किंवा शेवटचे पान बाहेर पडताच डायमेथोएट 30% घटक असलेले ॲग्रोस्टार कीटकनाशक @2 मिली प्रति लिटर पाण्यात स्टिकरसह मिसळून फवारणी करावी. यामुळे कीड नियंत्रणात येते आणि घडाचे नुकसान टाळले जाते.
👉अन्नद्रव्ये व्यवस्थापन:
घड पूर्ण निसवल्यानंतर 13:00:45 या विद्राव्य खताचे 4 किलो आणि कॅल्शिअम नायट्रेट 4 किलो प्रति एकर याप्रमाणे ठिबक सिंचनामधून आलटून-पालटून द्यावे. यामुळे फळांची गुणवत्ता सुधारते आणि उत्पादनामध्ये वाढ होते.
👉ही उपाययोजना वेळेवर केल्यास केळीचे उत्पादन दर्जेदार आणि अधिक नफा देणारे होते.
👉संदर्भ : AgroStar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.