गुरु ज्ञानAgrostar
कापूस पिकातील पुर्नबहार/फरदड नियोजन
👉🏻कापूस पिकामध्ये पुर्नबहार नियोजन करताना पूर्वीच्या हंगामात गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झालेला असल्यास कापसाचे पुर्नबहार घेणे टाळावे. अशा स्थितीत पिकाचे व्यवस्थापन काळजीपूर्वक करणे गरजेचे आहे.
👉🏻खरिपातील कापूस वेचणी करताना कीडग्रस्त व अपरिपक्व बोंडे काढून टाकावीत. पिकाची उंची 5 फुटांपेक्षा जास्त असल्यास शेंडा खुडल्याने बाजूने नवीन फुटवे व पानांची संख्या वाढते, जे उत्पादनासाठी फायदेशीर ठरते.
👉🏻पुर्नबहार नियोजनाआधी शेत तणविरहित करावे व हलकी वखरणी करून जमीन भुसभुशीत करावी. यामुळे खतांचे कार्यक्षम शोषण होते. खतांच्या योग्य व्यवस्थापनासाठी पुढील प्रमाणे खतांची मात्रा द्यावी:
- 10:26:26 खते - 50 किलो/एकर
- युरिया - 25 किलो/एकर
- मॅग्नेशिअम सल्फेट - 10 किलो/एकर
- ह्युमिक पावर ऐनएक्स - 400 ग्रॅम/एकर
- सल्फर मॅक्स - 3 किलो/एकर
👉🏻खतांची मात्रा दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी मुबलक पाणी देऊन खतांचे योग्य प्रभाव सुनिश्चित करावे. हे नियोजन योग्य पद्धतीने केल्यास कापूस उत्पादन वाढून अधिक नफा मिळवता येतो.
👉🏻संदर्भ : AgroStar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.