AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कापूस पिकातील तुडतुडे नियंत्रण
गुरु ज्ञानAgroStar
कापूस पिकातील तुडतुडे नियंत्रण
🌱बदलत्या हवामानामुळे, सततच्या रिमझिम पावसामुळे कापूस पिकामध्ये तुडतुडे किडीचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. या किडीचे प्रौढ व पिल्ले पानाच्या खालील बाजूला राहून रस शोषतात. त्यामुळे पाने प्रथम बाजूने पिवळसर होऊन नंतर तपकिरी होतात. अधिक प्रादुर्भावामध्ये संपूर्ण पाने लाल तांबडी, त्यांच्या कडा मुरगळलेली दिसतात. परिणामी झाडांची वाढ खुंटते. अशा झाडांना पाते, फुले आणि बोंडे कमी प्रमाणात लागतात. यावर उपाययोजना म्हणून डिनोटेफुरन 20% SG घटक असलेले डायना शील्ड कीटकनाशक @60 ग्रॅम प्रति एकरी घेऊन फवारणी करावी. 🌱संदर्भ : Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
7
0
इतर लेख