AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कापूस पिकातील तण नियंत्रण !
गुरु ज्ञानअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
कापूस पिकातील तण नियंत्रण !
शेतातील तण नियंत्रणासाठी पेंडीमेथिलिन ३० % असलेली तणनाशक १००० मिली /एकर बियाणे टोबणी नंतर मागे लगेच ओलसर जमिनीत तणनाशक फवारणी करावी, एकरी साधारण १० पंप तणनाशकाचे द्रावण फवारणी करणे प्रभावी राहील. कापूस बियाणे लागवड झाल्यावर दुसऱ्या दिवशी ज्या शेतात कापूस बी लागवड केली आहे त्या शेतात पाणी द्यावे, जर ठिबक उपलब्ध असेल तर २ तास ठिबक ने पाणी द्यावे. आपली जमीन वालुकामय किंवा चिकणमाती असेल तर लागवडीचा तिसऱ्या दिवशी , बियाणे उगवणक्षमता वाढण्यासाठी वापसा असेल तर पाणी द्यावे. मध्यम ते भारी जमीन असल्यास वापसा आला असेल तर पाणी देणे गरजेचे आहे , बियांच्या उगवणीसाठी पाणी वेळेवर देणे आवश्यक आहे. कापूस बियाणे जमिनीतून बाहेर येण्यास सुरुवात होईल. कापूस पिकाला शेतात सुमारे एक दोन पाने आलेली दिसताच, यावेळी सुरवातीच्या अवस्थेत कीड प्रादुर्भाव वर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. भरोसा किटची खरेदी शक्य तितक्या लवकर मागवणे. आता तुमचे पीक दोन ते तीन पानाच्या अवस्थेत असेल प्लॉट मध्ये बियाणे परीक्षण करावे एकरी झाडांची योग्य संख्या राखण्यास मदत होइल जिथे बियाणे उगवले नसेल अशा ठिकाणी बीटी अथवा नॉन बीटी बियाणे टोबून लावावे. बियाण्यावर उपचार केलेल्या औषधाचा प्रभाव आता कापसावर कमी होईल.आता तुम्ही कापूस पिकात फिरत असाल तर आपणास काळ्या रंगाचे रस शोषणारी कीड दिसेल. आता आपणास भरोसा किटचा वापर करणे गरजेचे आहे. कारण जमिनीतून येणारे कीड व रोग नियंत्रणासाठी कापूस भरोसा किट खूप फायदेशीर आहे.
28
7