गुरु ज्ञानAgroStar
कापूस पिकातील आकस्मित मर समस्या
🌱मागील काही दिवसांपासून पावसाचा पडलेला खंड आणि त्यानंतर अचानक झालेल्या पावसामुळे कापूस पिकामध्ये आकस्मित मर रोगाची समस्या खूप जास्त प्रमाणात दिसून येत आहे. ढगाळ वातावरण आणि जमिनीतील अतिरिक्त ओलावा या रोगास कारणीभूत ठरतात. यामध्ये मुळीची कार्य करण्याची क्षमता मंदावते. पानांचा तजेला कमी होऊन पाने मलूल होऊन जातात. तसेच पानांमधील ताठपणा कमी होतो. पाने, फुले, बोंडे सुकून गळायला सुरुवात होते. यावर उपाययोजना म्हणून आंतरप्रवाही बुरशीनाशकाचा जमिनीतून वापर करावा. तसेच पिकावरीन ताण कमी करण्यासाठी प्युअर केल्प 50 मिली सोबत 13:00:45 – 50 ग्रॅम प्रति 15 लिटर पंप याप्रमाणे फवारणी करावी.
🌱संदर्भ : Agrostar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा