AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कापूस दर तेजीत!
मान्सून समाचारअ‍ॅग्रोवन
कापूस दर तेजीत!
➡️कापूस दर आंतरराष्ट्रीय तसेच देशातही तेजीत आहेत . वाढलेली मागणी आणि कमी पुरवठा हे समिकरण २०२२ मध्येही सुरुच आहे. याचा लाभ कापूस बाजाराला होतोय. तसेच उन्हाळ्यात कॉटनच्या कपड्यांना मागणी वाढते, त्यामुळे कापड उद्योगांनी खरेदी सुरु केलीये. यामुळे बाजारात टिकून आहे. ➡️देशात सध्या कापसाचे दर ९ हजार ५०० ते १० हजार २०० रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान आहेत. ➡️देशात उत्पादन घटीमुळे शेतकऱ्यांकडील कापूस कमी असण्याची शक्यता, जिनिंग उद्योगाने व्यक्त केली आहे. तर व्यापारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देशातील शेतकऱ्यांकडे २० ते केंद्र २५ टक्के कापूस शिल्लक असण्याचा अंदाज आहे. ➡️कापडाला स्थानिक आणि निर्यातीसाठी असलेली मागणी, सूत तसेच कापसाची वाढलेली निर्यात यामुळे देशांतर्गत कापूस बाजारात दर टिकून आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातही कापूस दर तेजीत आहेत. ➡️भारत आणि अमेरिकेत कापसाच्या उत्पादनात घट झाल्याने पुरवठा कमी राहिल . त्यामुळे कापूस बाजार २०२२ मध्येही तेजीत राहण्याची शक्यता आहे. २०२१ मध्ये आंतरराष्ट्रीय कापूस बाजारात कापसाचे दर जवळपास ४१ टक्क्यांनी वाढले. शेतकऱ्यांना मिळणाऱ्या दराचा विचार करता, सरासरी दर ९ हजार ५०० ते १० हजार २०० रुपयांच्या दरम्यान आहेत. संदर्भ:-अ‍ॅग्रोवन, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
27
4
इतर लेख