AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
काकडीवर्गीय पिकांसाठी पोषक वातावरण
गुरु ज्ञानAgroStar
काकडीवर्गीय पिकांसाठी पोषक वातावरण
👉🏻काकडीवर्गीय पिकांमध्ये कलिंगड, खरबूज, काकडी यांचा समावेश होतो. या पिकांच्या बियाणांच्या उगवणीसाठी साधारणतः 18 डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त तापमानाची आवश्यकता असते. बियाण्यांची उगवण योग्य पद्धतीने होण्यासाठी तापमानाचा मोठा महत्त्वाचा वाटा असतो. 👉🏻या पिकांच्या वाढीसाठी 25 ते 35 डिग्री सेल्सियस दरम्यान तापमान अत्यंत योग्य मानले जाते. उष्ण व कोरड्या हवामानात काकडीवर्गीय पिकांची वाढ चांगली होते. भरपूर सूर्यप्रकाश आणि कमी आद्रता असल्यास उत्पादन जास्त मिळते, कारण अशा हवामानात झाडांच्या वाढीस पोषक वातावरण निर्माण होते व फळधारणा चांगली होते. 👉🏻काकडीवर्गीय पिकांची लागवड करताना हवामानाचा विचार करणे गरजेचे आहे. अतिशय कमी तापमान, अतिरिक्त थंडी तसेच अत्यंत जास्त तापमान काकडीवर्गीय पिकांच्या वाढीस अडथळा आणते. थंड हवामानात उगवण क्षमतेवर परिणाम होतो, तर जास्त तापमानात फळांची गुणवत्ता कमी होते व उत्पादन घटते. 👉🏻त्यामुळे या पिकांच्या यशस्वी उत्पादनासाठी योग्य हवामानाचा अंदाज घेऊन लागवड करावी. गरजेप्रमाणे पाण्याचे व्यवस्थापन, योग्य पोषण व सूर्यप्रकाशाची उपलब्धता राखल्यास काकडीवर्गीय पिकांपासून अधिक उत्पादन मिळवता येते. 👉🏻संदर्भ : AgroStar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
5
0
इतर लेख