गुरु ज्ञानAgroStar
काकडी वर्गीय पिकातील मोझॅक व्हायरस नियंत्रण
काकडीवर्गीय पिकांमध्ये मोझॅक हा विषाणूजन्य रोग आढळतो, जो मुख्यतः मावा किडीमुळे पसरतो. या रोगामुळे पिकाच्या उत्पादनावर गंभीर परिणाम होतो.
🔹लक्षणे:
- पानांवर आणि फळांवर गडद व फिक्कट हिरव्या रंगाचे चट्टे दिसतात.
- झाडाची वाढ खुंटते व फुलधारणा कमी होते.
- फळांची गुणवत्ता खालावते आणि उत्पन्नावर परिणाम होतो.
🔹नियंत्रण:
- हा रोग एकदा पिकात आल्यास नियंत्रणात येत नाही, त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय महत्त्वाचे आहेत.
- मावा किडीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी:
- सुरुवातीला पिवळे व निळे चिकट सापळे मोठ्या प्रमाणावर लावावेत.
- मावा आढळल्यास थायोमेथॉक्झाम घटक असणारे क्रुझर कीटकनाशक @ 100 ग्रॅम प्रति एकर फवारणी करावी.
मावा किडीवर नियंत्रण ठेवल्यास मोझॅक रोगाचा प्रसार रोखता येतो आणि पिकाचे नुकसान टाळता येते.
👉संदर्भ : AgroStar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.