गुरु ज्ञानAgrostar
कांदा रोपवाटिकेतील तण नियंत्रण
🌱महाराष्ट्रात खरिफ हंगामात कांदा पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यासाठी सुरुवातीला कांद्याची रोपवाटिका तयार केली जाते.
🌱या रोपवाटिकेमध्ये सुरुवातीच्या अवस्थेत तण व्यवस्थापन करणे गरजेचे आहे, अन्यथा तण रोपांसोबत सोबत अन्नद्रव्ये, पाणी, सूर्यप्रकाश, हवा आणि जागा यासाठी स्पर्धा करते. यामुळे रोपांची गुणवत्ता खालावली जाते.
🌱यावर उपाययोजना म्हणून गोल आणि लांब पानांचे तण व्यवस्थापन करण्यासाठी ऑक्सिफ्लुरफेन घटक असणारे ऑक्सिव्हिया तणनाशक @ 10 मिली आणि क्विझॉलफॉप ईथिल घटक असणारे क्विझ मास्टर @ 20 मिली प्रति 15 लिटर पंप याप्रमाणे घेऊन फवारणी करावी.
🌱संदर्भ:-Agrostar
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.