AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कांदा पिकातील करपा रोगासोबतच करा थ्रिप्स किडीचे नियंत्रण
गुरु ज्ञानAgrostar
कांदा पिकातील करपा रोगासोबतच करा थ्रिप्स किडीचे नियंत्रण
कांदा लागवडीनंतर सुरुवातीच्या अवस्थेत बदलत्या वातावरणामुळे करपा रोग व थ्रिप्स किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसतो. योग्य वेळी नियंत्रण न केल्यास पिकाचे मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे किंवा प्रादुर्भाव कमी असल्यावर तत्काळ उपाय करणे महत्त्वाचे आहे. 👉करपा रोग व थ्रिप्स कीड यांचे एकत्रित नियंत्रण करण्यासाठी खालील उपाययोजना करा: 1. थायोमेथॉक्झाम + लॅम्बडा सायहॅलोथ्रीन घटक असणारे किल एक्स @ 0.8 मिली प्रति लिटर पाणी याचा फवारणीसाठी वापर करा. 2. मेटॅलॅक्सिल + मॅन्कोझेब घटक असणारे मेटल ग्रो @ 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाणी याचा समावेश करा. 3. या मिश्रणासोबत उत्तम परिणामासाठी स्टिकरचा वापर अवश्य करा, त्यामुळे औषधाची प्रभावीता वाढते. 👉फवारणीसाठी सकाळी किंवा संध्याकाळी वेळ निवडावी. पिकातील रोग व किडींचा प्रादुर्भाव कमी असल्यास वेळेवर नियंत्रण करून उत्पादनात होणारे नुकसान टाळता येते व उत्पन्नामध्ये वाढ करता येते. 👉संदर्भ : AgroStar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
3
0
इतर लेख