AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कांदा पिकातील करपा रोग नियंत्रण
गुरु ज्ञानAgroStar
कांदा पिकातील करपा रोग नियंत्रण
👉बदलत्या वातावरणामुळे कांदा पिकात करपा रोगाची समस्या गंभीर होत आहे. या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर कांद्याची पात शेंड्यापासून करपलेली दिसते, ज्यामुळे पानांवर काळपट ठिपके पडतात. याचा थेट परिणाम पिकाच्या वाढीवर होतो, ज्यामुळे उत्पादनात घट होते. करपा रोगाचे प्रमाण जास्त झाल्यास पिकाचा गुणवत्ता आणि उत्पन्न दोन्ही घटते. 👉करपा रोगामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी योग्य वेळी प्रतिबंधात्मक उपाय करणे महत्त्वाचे आहे. यासाठी हेक्साकोनॅझोल 5% आणि कॅप्टन 70% घटक असणारे कॅपॅसिटी बुरशीनाशक @ 300 ग्रॅम प्रति एकर फवारणी करावी. योग्य प्रमाणात आणि वेळेत फवारणी केल्यास करपा रोगाचे नियंत्रण करण्यात मदत होऊन पिकाची गुणवत्ता आणि उत्पादन टिकवून ठेवता येते. 🌱संदर्भ : Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
14
0
इतर लेख