गुरु ज्ञानAgroStar
कांदा पिकात जांभळा करपा प्रादुर्भाव लक्षणे आणि उपाय
👉🏻अल्टरनेरिया पोराय या बुरशीमुळे पिकांमध्ये जांभळ्या करप्याचा प्रादुर्भाव कोणत्याही अवस्थेत होऊ शकतो. हा रोग प्रामुख्याने पानांवर दिसून येतो. पानांवर सुरुवातीस खोलगट, लांबट सफेद चट्टे दिसतात, ज्यांचा मध्यभाग जांभळसर होतो आणि कालांतराने काळपट होतो. हा रोग प्रामुख्याने रब्बी हंगामात अवकाळी पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे अधिक तीव्र होतो.
👉🏻हा रोग पिकाचे 50 ते 70 टक्के नुकसान करू शकतो, त्यामुळे वेळेवर नियंत्रण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
👉🏻नियंत्रणासाठी उपाययोजना:
1. नत्रयुक्त खताचा जास्त आणि उशिरा वापर टाळावा, कारण यामुळे रोगाची तीव्रता वाढू शकते.
2. रोगाचा प्रादुर्भाव दिसल्यास अझोक्सिस्ट्रॉबीन 11% + टेबुकोनाझोल 18.3% घटक असणारे रोझतम बुरशीनाशक @200 मिली प्रति एकर याप्रमाणे फवारणी करावी.
3. फवारणी करताना स्टिकरचा वापर केल्यास फवारणी अधिक प्रभावी ठरते.
👉🏻वेळीच रोग नियंत्रण केल्याने पिकाची गुणवत्ता टिकवून ठेवता येते आणि उत्पादनात होणारे नुकसान टाळता येते. नियमित निरीक्षण आणि योग्य उपाययोजना ही जांभळ्या करप्या रोगावरील प्रभावी रणनीती आहे.
👉🏻संदर्भ : AgroStar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.