AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कांदा निर्यातीत ५६ टक्क्यांनी वाढ; तरीही आयात
कृषि वार्ताअॅग्रोवन
कांदा निर्यातीत ५६ टक्क्यांनी वाढ; तरीही आयात
देशातून यंदा एप्रिल-जुलैदरम्यान कांदा निर्यातीत ५६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तरीही सध्या देशांतर्गत बाजारात कांद्याचे किरकोळ दर वाढले असल्याचे कारण देत केंद्राकडून कांदा आयात केली जात आहे.
देशातील विविध भागांत कांद्याचे दर वाढले आहे. या पार्श्वभूमीवर कांद्याचे दर नियंत्रणात राहावेत, उपलब्धतता वाढावी यासाठी गेल्या आठवड्यात केंद्र सरकारने एमएमटीसी या सरकारी एजन्सीमार्फत इजिप्त, चीनमधून कांदा आयातीसाठी परवानगी दिली आहे. एमईपी काढल्याने निर्यातीत वाढ ‘डीजीसीआयएस’कडून मिळालेल्या माहितीनुसार, एप्रिल- जुलैदरम्यान प्रतिटन ११,७३७ रुपये दराने कांदा निर्यात झाली. कांदा निर्यात मूल्यामुळे दर कमी मिळून निर्यातीत घट झाली होती. मात्र डिसेंबर २०१५ मध्ये कांद्यावरील निर्यात मूल्य काढून टाकण्यात आले. त्यानंतर कांद्याचे किरकोळ दर वाढल्यानंतर कांद्यावर किमान निर्यात मूल्य लागू करण्याची मागणी ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान यांनी केली होती. मात्र निर्यात मूल्य लागू करण्यात आले नाही. संदर्भ –अग्रोवन 13 नोव्हे १७
41
0