AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषि वार्ताAgroStar India
कलिंगड रोपांची योग्य लागवड कधी कराल?
👉रोपांची लागवड योग्य वेळी केल्यास त्यांचा विकास अधिक चांगला होतो आणि पिकाची जोमदार वाढ होते. थंड वातावरणात, विशेषतः डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात, सकाळी लागवड करणे अधिक योग्य ठरते. सकाळी लागवड केल्याने दिवसभरात कमी तापमानामुळे रोपांना चांगली सेटिंग मिळते आणि त्यांचा वाढीला चालना मिळते. 👉अत्यंत थंडीत रात्री लागवड केल्यास पानांवरील पाणी गोठू शकते, ज्यामुळे रोपं वाया जाऊ शकतात. त्यामुळे थंडीच्या महिन्यात सकाळी लागवड करणे उत्तम. 👉थंडीचे महिने वगळता, बाकीच्या हंगामात संध्याकाळी लागवड करावी. संध्याकाळी हवामान थोडं शांत असतं, जेणेकरून रोपांना लागवडीची चांगली परिस्थिती मिळते. 👉सर्वसाधारणपणे, योग्य वेळ आणि काळजीपूर्वक लागवडीच्या पद्धतीमुळे रोपांचा विकास चांगला होतो आणि उत्पादन वाढते. 👉🏻संदर्भ : AgroStar India वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
4
0
इतर लेख