AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कलिंगड पिकातील रसशोषक कीड नियंत्रणासाठी उपाययोजना
गुरु ज्ञानAgroStar
कलिंगड पिकातील रसशोषक कीड नियंत्रणासाठी उपाययोजना
👉कलिंगड पिकाच्या निरोगी वाढीसाठी आणि उत्तम उत्पादनासाठी पिकातील रसशोषक किडी आणि रोगांचे प्रतिबंधात्मक व्यवस्थापन महत्त्वाचे असते. कलिंगड पिकामध्ये सफेद माशी, मावा, तुडतुडे आणि थ्रीप्स या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. या किडींमुळे पिकाच्या उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो, त्यामुळे सुरुवातीच्या अवस्थेतच किडी नियंत्रण करणे गरजेचे आहे. 👉कलिंगड पिकाच्या 2 ते 4 पानांच्या अवस्थेत किडींपासून संरक्षण आणि पांढऱ्या मुळीच्या उत्तम वाढीसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून थायमेथॉक्साम 75% एसजी घटक असणारे शटर कीटकनाशक 100 ग्रॅम आणि ह्युमिक पॉवर एनएक्स 400 ग्रॅम एकत्र 200 लिटर पाण्यामध्ये मिसळून आळवणी करावी. हे मिश्रण जमिनीतील कीड नियंत्रणास देखील मदत करते आणि पिकाच्या निरोगी विकासासाठी आवश्यक पोषक तत्त्वे उपलब्ध करून देते. 👉या प्रकारे योग्य व्यवस्थापन केल्यास कलिंगड पिकाचा विकास निरोगी राहतो, पिकाचे उत्पादन वाढते आणि उत्पन्नात सुधारणा होते.👉 👉स्रोत:- AgroStar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
5
0
इतर लेख