AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कलिंगड पिकाच्या जोमदार वाढीसाठी उपायोजना
गुरु ज्ञानAgroStar
कलिंगड पिकाच्या जोमदार वाढीसाठी उपायोजना
👉कलिंगड पिकाची जोमदार वाढ आणि उत्पादन सुधारण्यासाठी सुरुवातीच्या काळात योग्य काळजी घेणे महत्त्वाचे आहे. बियाणे उगवल्यानंतर 10-15 दिवसांनी पिकास आवश्यक पोषक घटक मिळावे यासाठी ठिबक सिंचनाचा वापर करावा. या प्रक्रियेत 19:19:19 या संतुलित खताचे 1 किलो प्रति दिवस या प्रमाणात ठिबक मधून सोडावे, ज्यामुळे वेलींच्या वाढीस गती मिळते. 👉याशिवाय, मॅग्नेशिअम सल्फेट आणि कॅल्शिअम नायट्रेट प्रत्येकी 5 किलो प्रति एकर ठिबक सिंचनाद्वारे वेगवेगळ्या वेळी देणे आवश्यक आहे. यामुळे पिकास आवश्यक खनिजे मिळून वेलींची वाढ अधिक जोमदार होते. 👉किडींचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन नियंत्रणासाठी प्रति एकर 6 पिवळे आणि निळे सापळे लावावेत. या सापळ्यांमुळे पिकातील किडींची माहिती मिळते व किडींच्या प्रादुर्भावाचे प्रमाण समजून योग्य ती नियंत्रणाची उपाययोजना करता येते. वेळेवर करण्यात येणारी ही काळजी पिकाच्या उत्पादनावर सकारात्मक परिणाम करते. 🌱संदर्भ : AgroStar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
8
0
इतर लेख