गुरु ज्ञानAgroStar
कलिंगड पिकाची काढणी
कलिंगडाच्या उत्पादनात गुणवत्तापूर्ण आणि गोड फळे मिळवण्यासाठी योग्य वेळेत काढणी करणे आवश्यक आहे. प्रत्येक वाणानुसार साधारणतः 70 ते 90 दिवसांमध्ये फळे काढणीसाठी तयार होतात. योग्य वाढ झालेली फळे निवडून काढणी करावी, कारण अपूर्ण वाढ झालेली फळे चव आणि पोषणमूल्याने कमी गुणवत्तेची असतात.
👉कलिंगड काढणीस तयार झाल्याची प्रमुख लक्षणे:
✅ फळाचा आकार: पूर्ण गोलसर आणि मधला भाग थोडा फुगीर दिसतो.
✅ देठ सुकणे: फळाचे देठ कोरडे आणि तपकिरीसर होत जाते.
✅ ध्वनी चाचणी: पक्क्या फळावर बोटांनी मागच्या बाजूने वाजवल्यास डबडब असा आवाज येतो, तर अपरिपक्व फळात हा आवाज येत नाही.
✅ फळाचा देठावरील लव: फळ पूर्ण तयार होताना देठावरील लव नाहीशी होते.
✅ स्पर्श चाचणी: हाताने दाबल्यास कर्रकर्र असा आवाज येतो.
✅ फळाचा तळभाग: जमिनीला टेकलेला भाग पांढरट- पिवळसर रंगाचा दिसतो.
✅ गर आणि चव: पूर्ण वाढ झालेल्या फळाचा गर गर्द लाल आणि गोडसर लागतो.
कलिंगड योग्य वेळी काढल्यास त्याची गोडसर चव आणि टिकावू गुणवत्ता उत्तम राहते.
👉संदर्भ : AgroStar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.