सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
कलिंगड आणि खरबूज पिकातील फळ माशीचे नियंत्रण!
▶️शेतकरी बंधूंनो उन्हाळ्यात कलिंगड व खरबूज पिकामध्ये फळ माशीचा प्रादुर्भाव जास्त आढळतो.
▶️प्रौढ मादी माशी फळाच्या सालीमध्ये अंडी घालते.
▶️अंड्यांतून बाहेर पडलेल्या अळ्या फळांमध्ये शिरतात व आतील गर खातात.
▶️प्रादुर्भावग्रस्त लहान फळे जमिनीवर पडतात.
▶️हि फळे कुजतात व त्यामधून दुर्गंधीत वास येतो.
फळांचा आकार बदलतो.
▶️जिथे अंडी घातलेली असतात तिथून फळातून चिकट द्रव बाहेर येतो. हा द्रव वाळतो आणि त्याचे तपकिरी रंगाच्या डिंकात रूपांतर होते.
▶️यामुळे, फळावर डाग पडतात आणि फळाची गुणवत्ता घसरते.
▶️या किडीचे वेळीच नियंत्रण न केल्यास पिकाचे १००% नुकसान होण्याची शक्यता असते.
▶️ही कीड उष्ण हवामानात अधिक सक्रिय असते.
▶️याच्या नियंत्रणासाठी प्रादुर्भावग्रस्त फळे आणि डाग पडलेली फळे ▶️गोळा करून मातीत गाडून नष्ट करावीत.
▶️पीक नेहमी तणमुक्त ठेवावे.
▶️पिकाच्या भोवती एक दोन ओळी मका पिकाची लागवड करून त्यावर नियमित कीटकनाशकाची फवारणी करावी.
▶️प्रौढ माशीच्या नियंत्रणासाठी गूळ @ ४५० ग्रॅम १० लिटर पाण्यात विरघळवून २४ तास ठेवा आणि फुलधारणा सुरुवात झाल्यास आठवड्यातून एकदा १० मिली डीडीव्हीपी मिसळून पीकांवर फवारणी करावी.
▶️फळ माशीच्या नरांना आकर्षक करून नष्ट करण्यासाठी प्रति एकरी 'क्यू ल्युर सापळे' @ ८ ते १० प्रत्येकी १ मीटर अंतरावर लावावे.
▶️सापळ्यांमधील माश्या प्रत्येकी २ आठवड्यांनी काढून नष्ट कराव्यात.
▶️पीक कालावधीत असे सापळे प्रभावी असतात, त्यामुळे हे सापळे बदलू नयेत.
▶️शेतात एकमेकांना समान अंतरावर सापळे स्थापित करा.
▶️जर सापळे लाकडी काठीच्या सहाय्याने स्थापित करत असाल तर त्याला वाळवी लागणार नाही याची काळजी घ्यावी.
▶️हवा किंवा वार्यामुळे सापळे पडणार नाहीत अश्या पद्धतीने सापळे बसवावेत.
▶️कुत्रे किंवा इतर जनावरांपासून सापळ्यांचे संरक्षण करावे.
संदर्भ:- अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स,
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.