AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
ऐकलं का ! २५ दिवसानंतर येतील तुमच्या बँक खात्यामध्ये येतील २ हजार रुपये.
कृषी वार्ताकृषि जागरण
ऐकलं का ! २५ दिवसानंतर येतील तुमच्या बँक खात्यामध्ये येतील २ हजार रुपये.
➡️केंद्र सरकारची सगळ्यात मोठी शेतकऱ्यांची योजना म्हणजे पीएम किसान योजना. या योजनेच्याद्वारे शेतीसाठी तुमच्या बँक अकाउंटमध्ये २० हजार रुपये पाठवण्याची तयारी सुरू आहे. ➡️पंतप्रधान शेतकरी किसान सन्मान निधी योजनेचा हा सातवा हप्ता १ डिसेंबर पासून यायला सुरू होईल. म्हणजेच २५ दिवसांनंतर केंद्र सरकार तुमच्या खात्यामध्ये २ हजार रुपये ट्रान्सफर करेल. ➡️या योजनेद्वारे एका वर्षात तीन हप्त्यांच्या माध्यमातून ६ हजार रुपये दिले जातात. आतापर्यंत शेतकऱ्यांना सहा हप्ते पाठविण्यात आले आहेत. मागच्या २३ महिन्यांमध्ये केंद्र सरकारने ११.१७ कोटी शेतकऱ्यांना ९५ कोटी पेक्षा जास्त मदत केली आहे. या तीन हा त्यापैकी पहिला हप्ता १ डिसेंबर ते ३१ मार्चच्या मध्ये येतो. दुसरा हप्ता हा १ एप्रिल ते ३१ जुलैच्या दरम्यान आणि तिसरा हप्ता एक ऑगस्ट ते ३० नोव्हेंबरच्या दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यावर ट्रान्सफर केला जात आहे. ➡️जर सगळ्या प्रकारचे डॉक्युमेंट व्यवस्थित दिल्या असतील तर ११.१७ खोटी रजिस्टर शेतकऱ्यांच्या खात्यावर सातवा हप्ता ट्रान्सफर केला जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले स्वतःचे रेकॉर्ड व्यवस्थित चेक करून घ्यावे. कारण की, त्यामुळे तुम्हाला पैसे महिन्यांमध्ये समस्या यायला नको. ➡️कृषी मंत्रालयाच्या सूत्रानुसार, १.३ करोड शेतकऱ्यांनी अर्ज करून सुद्धा त्यांच्या खात्यात पैसे देऊ शकला नाही कारण त्यांच्या रेकॉर्डमध्ये काहीतरी चुकी आहे किंवा आधार कार्ड नाही किंवा नावाच्या स्पेलिंग मध्ये काहीतरी चुकी झाली आहे, त्यामुळे अशा शेतकऱ्यांचा येणारा पैसा हा थांबलाय. Image- sent on whts up तुमचे स्वतःचे रेकॉर्ड कसे चेक करावे? या योजनेचे ऑफिशिअल वेबसाईट pmkisan.gov.in ही आहे. या वेबसाईटला लॉग इन करून यामध्ये दिलेल्या फार्मर कॉर्नर या त्यावर क्लिक करावे. जर तुम्ही अगोदर अर्ज दिला असेल आणि तुमचा आधार व्यवस्थित अपलोड झाले नसेल किंवा तुमचा आधार नंबर चुकीचा नोंद केली गेली असेल इत्यादी चुक्याची माहिती तुम्हाला मिळेल. फार्मर कॉर्नर या टॅबमध्ये या योजनेमध्ये रजिस्टर करण्यासाठी चा पर्याय दिलेला असतो. या टॅबमध्ये सरकारने लाभार्थ्यांची सगळी यादी अपलोड केलेली आहे. आपल्या अर्जाची स्टेटस, आधार क्रमांक, बँकेचा खाता क्रमांक इत्यादी द्वारे तुम्ही माहिती करू शकता. मंत्रालयाशी संपर्क करण्याची सुविधा ही योजना मोदी सरकारची सगळ्यात मोठी शेतकरी योजना आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात सवलती दिल्या गेल्या आहेत. त्याच्यातली एक म्हणजे हेल्पलाइन नंबर, त्याआधारे तुम्ही देशाच्या कुठल्याही कोपऱ्यातून थेट कृषी मंत्रालयाशी संपर्क करू शकतो. अधिक संपर्कासाठी १) पीएम किसान टोल फ्री नंबर -१८००११५५२६६ २) पी एम किसान हेल्पलाइन नंबर - १५५२६१ ३) ई-मेल आयडी-pmkisan-ict@gov.in अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी क्लिक करा:ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020
संदर्भ - कृषी जागरण, यासारख्या अधिक महत्वाच्या व कृषी विषयक घडामोडी जाणून घेत रहा व माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
143
4
इतर लेख