सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
ऊस पिकातील सिलीकॉनचे महत्व
सिलिकॉन चे महत्व हे अनेक पिकांमध्येमध्ये वाढू लागले कारण सिलीकॉनचे बरेच फायदे पिकांमध्ये दिसून आले आहेत.त्यातील उस पिकामध्ये सिलिकॉनचे मोठ्या प्रमाणात महत्व वाढले आहे .
ऊसपीक हे सिलिकॉन अन्नद्रव्य मोठ्या प्रमाणात शोषून घेते व त्याची साठवण पानात व खोडात करतात ऊस हे पिक इतर पिकांच्या तुलनेत एकरी २५० ते ३०० किलो सिलिकॉन शोषून घेते.
पिकांची वाढ –
1) सिलिकॉन हे ऊसाच्या पानाच्या पेशिभित्तीवर सिलिका जेल या स्वरुपात साठवून राहते त्यामुळे पानावर जाड थर तयार होतो.या थरामुळे पिकांना वाढण्यास जोर मिळतो व पिके सरळ वाढतात पिकांचे जमिनीवर पडण्याचे प्रमाण कमी होते त्यामुळे प्रकाश संश्लेषणास मदत होऊन पिकांची उंची ,खोडाची जाडी व फुटव्यांची संख्या वाढते .सिलिकॉन हे साखर तयार करुन ती त्याच स्वरुपात टिकवून ठेवण्याचे काम करते.पिकांची प्रतिकार शक्ती वाढून पानातील बाष्पीभवनाचे प्रमाण कमी होते.त्यामुळे सोडीयम सारख्या घातक क्षारांचे प्रमाण कमी होते व पिकांमध्ये पाण्याचा तान सहन करण्याची क्षमता वाढते.
2) नत्राचे प्रमाण स्थिर ठेवण्यास मदत –
पानांत विद्राव्य सिलिकॉन चे प्रमाण०.७ टक्क्यापेक्षा जास्त असल्यास मँगनीजसारखी धातू एकाच ठिकाणी न राहता इतरत्र सारख्या प्रमाणात पसरतात त्यामुळे होणारे विपरीत परिणाम टळतात.सिलिकॉन मुळे जमिनीतील स्फुरद स्थिरीकरणाची प्रक्रिया कमी होऊन स्फुरद चांगल्या रीतीने पिकांद्वारे शोषुन घेतला जातो तसेच पिकांमध्ये स्फुरद चे प्रमाण नियंत्रित राहते तसेच जास्त झालेलेया नत्रामुळे होणारे परिणाम टळून नत्र स्थिर ठेवण्यास सिलिकॉन मदत करते.
3) आर्थिकदृष्ट्या फायदेशीर-
रासायनिक स्रोतातील सिलिकॉन खते हे शेतकऱ्यांना परवडत नसल्यामुळे ते शेतकरी वापरू शकत नाहीत.म्हणून याला पारंपारिक स्रोताचा विचार केला असता महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या शिफारशी नुसार १ ते १.५ टन बगॅस अॅश उसात वापरली असता त्यापासून ४०० किलो सिलिकॉन ऊसाला उपलब्ध होते. पाचाटाचे कंपोष्ट करूनहि उसाला सिलिकॉन चा पुरवठा केला जातो.