AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
ऊस पिकातील तण व्यवस्थापण
गुरु ज्ञानAgroStar
ऊस पिकातील तण व्यवस्थापण
👉🏻ऊस पिकात आडसाली तसेच पूर्वहंगामी लागवडीमध्ये तण नियंत्रणासाठी योग्य पद्धतींचा अवलंब करणे अत्यावश्यक आहे. लागवडीनंतर सुरुवातीला बाळबांधणीसाठी आंतरमशागत करून तण हटवावेत. यामुळे तणाच्या नियंत्रणाबरोबरच मातीला पुरेसा वापसा देखील मिळतो. 👉🏻लांब व रुंद पानांच्या तणांसाठी तण 2 ते 4 पाने अवस्थेत असताना **मेसोट्रिओन 2.27% + ॲट्राझिन 22.7% एससी** घटक असलेले **मेसोझिन एक्स्ट्रा** @1.4 लिटर प्रति एकर 200 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. तणावर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी तण 2-4 पानांच्या अवस्थेत असावे आणि जमिनीत पुरेसा वापसा असावा. 👉🏻फवारणी करताना फ्लॅट फॅन किंवा फ्लड जेट नोझलचा वापर करावा. द्रावण तयार करताना स्वच्छ पाण्याचा वापर करणे अत्यावश्यक आहे, कारण अशुद्ध पाण्यामुळे फवारणीची कार्यक्षमता कमी होऊ शकते. तणनाशक फवारणी ही कृषी सल्लागारांच्या मार्गदर्शनाखाली करावी. या उपायांनी तण नियंत्रण होऊन उसाच्या उत्पादकतेत वाढ होण्यास मदत होते. 👉🏻संदर्भ : AgroStar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
15
0
इतर लेख