AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
ऊस पिकातील खोडकिडा नियंत्रणासाठी उपाययोजना
गुरु ज्ञानAgrostar
ऊस पिकातील खोडकिडा नियंत्रणासाठी उपाययोजना
👉🏻सध्या ऊस पिकात, विशेषतः नवीन लागवड केलेल्या आणि खोडवा उसामध्ये खोडकिडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. या किडीमुळे पोंगे मर होण्याची समस्या निर्माण होऊन ऊस उत्पादनामध्ये घट होते. या समस्येवर प्रभावी उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे. 👉🏻नियंत्रणासाठी शिफारसी: 1. प्रतिबंधात्मक उपाय: जमिनीतून क्लोरँट्रनिलीप्रोल 0.4% GR घटक असलेले *रॅपीजन जीआर* कीटकनाशक @ 8 किलो प्रति एकर खतासोबत मिसळून द्यावे. यामुळे खोडकिडीचा प्रारंभिक प्रादुर्भाव टाळता येतो. 2. प्रादुर्भाव झाल्यास उपाय: क्लोरँट्रनिलीप्रोल 18.5% SC घटक असलेले रॅपीजन कीटकनाशक @ 150 मिली प्रति एकर पाण्यात मिसळून आळवणी करावी. यामुळे खोडकिडीचा प्रादुर्भाव नियंत्रित करता येतो. 👉🏻महत्त्वाचे: - पिकांची नियमित पाहणी करून प्रादुर्भावाच्या पहिल्या टप्प्यातच उपाययोजना करावी. - शिफारसीनुसार कीटकनाशकांचा वापर केल्यास नुकसान कमी होऊन उत्पादनात वाढ होईल. खोडकिडीच्या समस्येला निरोप देऊन ऊस उत्पादन अधिक फायदेशीर बनवा! 👉🏻संदर्भ : AgroStar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
3
0
इतर लेख