गुरु ज्ञानAgroStar
ऊस पिक तणमुक्त करण्याचा उपाय!
🌱आडसाली तसेच पूर्वहंगामी लागवड केलेल्या उसातील तण नियंत्रणासाठी सुरुवातीला बाळबांधणी सारखी आंतरमशागत करून तण नियंत्रण करावे. तसेच ऊस पिकातील लांब आणि रुंद पानांच्या तणांसाठी तण 2 ते 4 पाने अवस्थेत असताना मेट्रिबुझीन 70% डब्लूपी घटक असणारे वारीस 300 ग्रॅम तणनाशक सोबतच 2, 4, डी घटक असलेले क्लीनवीड तणनाशक @ 1 लिटर प्रति 150 पाणी याप्रमाणे घेऊन एकरी फवारणी करावी. तणनाशकाची फवारणी करताना फ्लॅट पॅन अथवा फ्लड जेट नोझल चा वापर करावा आणि तणनाशकांचे द्रावण तयार करताना स्वच्छ पाण्याचा
वापर करावा.
🌱संदर्भ:- Agrostar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.