AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
उसातील पिवळेपणाची कारणे आणि उपाययोजना!
गुरु ज्ञानAgroStar
उसातील पिवळेपणाची कारणे आणि उपाययोजना!
👉जमिनीत सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता ही शेती उत्पादनावर मोठा परिणाम करणारी समस्या आहे. यामागे अनेक कारणे जबाबदार असतात – रासायनिक खतांचा असंतुलित वापर, सेंद्रिय खतांचा अभाव, जमिनीला विश्रांती न देणे, एकाच पिकाचे सतत उत्पादन घेणे, तसेच जमिनीचा जास्त सामू (pH) आणि मुक्त चुन्याचे प्रमाण यामुळे सूक्ष्म अन्नद्रव्ये शोषून घेतली जात नाहीत. 👉याचा थेट परिणाम पीक वाढीवर होतो. पानांची पिवळसरता, मरगळ, वंशवाढीमध्ये अडथळा आणि उत्पादनात घट असे परिणाम दिसून येतात. ऊसाच्या बाबतीत ही समस्या अधिक गंभीर बनते, कारण त्यामुळे ऊसाची वाढ मंदावते आणि साखर उत्पादनात घट येते. 👉या समस्येवर उपाय म्हणून "न्युट्रीप्रो आयर्न 17%" @500 ग्रॅम प्रति एकर युरिया @50 किलोबरोबर फोकून द्यावे. ठिबक सिंचन सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी त्याच प्रमाणात खत थेट ठिबकद्वारे द्यावे. 👉याशिवाय, पानांद्वारे अन्नद्रव्ये देण्यासाठी 19:19:19 @3 ग्रॅम + न्युट्रीप्रो ग्रेड 2 (चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये) @1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. संतुलित पोषणामुळे पीक निरोगी राहते आणि उत्पादनात निश्चितच वाढ होते. 👉संदर्भ : AgroStar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
0
0
इतर लेख