कृषि वार्ताAgroStar India
उन्हाळ्यात जास्त तापमानामुळे खतांचा पिकात वापर करताना घ्यावयाची काळजी
👉सर्व पिकांमध्ये अधिक उत्पादन आणि उत्तम गुणवत्ता मिळवण्यासाठी योग्य लागवड, पाणी व्यवस्थापन आणि संतुलित अन्नद्रव्ये पुरवणे आवश्यक असते. मात्र, उन्हाळ्यात विशेषतः मार्च ते एप्रिल महिन्यात तापमान खूप जास्त असल्याने काही खतांचा वापर टाळावा, कारण ते मातीतील उष्णता वाढवतात आणि पिकांना हानी पोहोचवू शकतात.
👉उष्णता निर्माण करणाऱ्या खतांमध्ये कोंबडी खत, सिंगल सुपर फॉस्फेट (11% गंधक घटकामुळे) आणि गंधक 90% यांचा समावेश होतो. या खतांचा जास्त प्रमाणात वापर केल्यास मातीतील तापमान वाढून मुळांना धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे उन्हाळ्यात त्याचा वापर मर्यादित ठेवावा.
👉उन्हाळ्यात पिकांचे आरोग्य टिकवण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर वाढवावा, ठिबक सिंचनाचा अवलंब करावा आणि मातीचे आच्छादन (मल्चिंग) करावे. यामुळे मातीतील आर्द्रता टिकून राहते आणि पिकांचे योग्य वाढीस मदत होते.
👉संदर्भ : AgroStar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.