AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
उन्हाळी हंगामात शेवगा पिकाची छाटणी!
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
उन्हाळी हंगामात शेवगा पिकाची छाटणी!
➡️शेवग्याचे झाड झपाट्याने वाढते. लागवडी नंतर ३-४ महिन्यातच झाडाची उंची १२०-१५० से.मी.होते. ➡️रोपे लागवडीनंतर जातीनुसार ७५-१०० सें. मी. किंवा ९०-१२० सें. मी. उंचीची झाल्यावर शेंडा हाताने खुडावा. म्हणजे फांद्या अधिक येतात. झाडाची उभट वाढ होत नाही. ➡️शेंगा झाडाच्या खालच्या बाजूला येऊन काढणी सुलभ होते. छाटणी करतेवेळी झाडाची साल निघणार नाही, याची काळजी घ्यावी. ➡️शेवग्याच्या लागवडीनंतर झाडाची दोनदा छाटणी करावी. पहिली छाटणी लागवडीनंतर ३-४ महिन्यांनी करावी. त्यात झाडाचे मुख्य खोड जमिनीपासून १ मीटर अंतरावर छाटणी करावी. दुसरी छाटणी ७-८ महिन्यांनी करावी. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
11
6