AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
उन्हाळी भुईमूग पेरणीचे नियोजन
गुरु ज्ञानAgroStar
उन्हाळी भुईमूग पेरणीचे नियोजन
👉भुईमूग हे तीनही हंगामांमध्ये घेतले जाणारे गळीत धान्य पीक आहे, जे उगवण आणि उत्पादनाच्या दृष्टीने शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरते. पाण्याची उपलब्धता असल्यास, उन्हाळी भुईमूगाची पेरणी 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यान पूर्ण केली पाहिजे. 👉लागवडीसाठी हलकी ते मध्यम, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडणे आवश्यक आहे. अशी जमीन ज्यामध्ये वाळू आणि सेंद्रिय घटकांचे योग्य प्रमाणात मिश्रण आहे, ती भुसभुशीत असते. यामुळे आऱ्या जमीन सहजपणे घुसून शेंगा चांगल्या प्रकारे पोसतात. 👉वाणानुसार आणि दाण्याच्या आकारमानानुसार एकरी 30 ते 40 किलो बियाणे लागवडीसाठी वापरले जाते. बियाणाची उगवण चांगली व्हावी यासाठी किडकनाशक आणि बुरशीनाशक वापरून बिरप्रक्रिया केली जाते. पेट्रा 3 डी 7 मिली प्रति किलो बियाणास वापरून हे केले जाते. 👉यामुळे बियाणाची उगवण चांगली होईल आणि पीक अधिक निरोगी व मजबूत होईल. योग्य पद्धतीने लागवड केल्यास भुईमूगाचे उत्पादन उच्च गुणवत्तेचे मिळते. 👉संदर्भ : AgroStar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
23
0
इतर लेख