AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
उत्पादन वाढीसाठी सूर्यफूल पिकामध्ये संजीवकाचा वापर
गुरु ज्ञानAgrostar
उत्पादन वाढीसाठी सूर्यफूल पिकामध्ये संजीवकाचा वापर
👉🏻रब्बी हंगामात सूर्यफुलाची पेरणी नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात पूर्ण केली जाते. योग्य पेरणीसाठी मध्यम ते भारी जमीन निवडावी. सूर्यफुल पेरणीनंतर साधारणतः 45 ते 55 दिवसांनी फुले उमलण्यास सुरुवात होते. 👉🏻फुले उमलण्याच्या टप्प्यावर पिकाची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. या वेळी नॅपथील असेटिक ऍसिड घटक असणारे 'होल्ड ऑन' संजीवक 2 मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. या संजीवकाच्या फवारणीमुळे दाणे भरण्याचे प्रमाण वाढते, ज्यामुळे उत्पादनात लक्षणीय वाढ होते. 👉🏻तसेच, फुलांच्या काळात कीड व रोग नियंत्रणासाठी वेळोवेळी निरीक्षण करावे आणि योग्य ती उपाययोजना करावी. सूर्यफुल पिकासाठी संतुलित खत व्यवस्थापन आणि पुरेसा ओलावा राखणे अत्यावश्यक आहे. 👉🏻सूर्यफुल पिकाची योग्य काळजी घेतल्यास रब्बी हंगामात दर्जेदार उत्पादन घेता येते आणि शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फायदा होतो. 👉🏻संदर्भ : AgroStar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
4
0
इतर लेख