गुरु ज्ञानAgroStar
आले आणि हळद पिकातील कंदकूज रोगाचे नियंत्रण
🌱आले आणि हळद पिकातील कंदकूज यामध्ये कंदातील कोवळ्या फुटीवर लागण होऊन पाने पिवळसर तपकिरी होतात. तपकिरी काळपट रंगाचे खोड सहज उपटून येते. कंद मऊ पडून त्यातून घाण वास येणारे पाणी बाहेर पडते. हा रोग ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीमध्ये जास्त दिसतो. याच्या नियंत्रणासाठी थिओफेनेट मिथाइल 70% WP घटक असणारे TMT 70 @500 ग्रॅम सोबत कॉपर ऑक्सिक्लोराईड 50% WG घटक असणारे कुपर-1 बुरशीनाशक @500 ग्रॅम प्रति एकर याप्रमाणे जमितीतून खतांसोबत मिक्स करू अथवा आळवणी पद्धतीने
वापरावे.
🌱संदर्भ : Agrostar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.