AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
आता रेशन दुकानातून छोटे सिलिंडर खरेदी करता येणार!
समाचारTV9 Marathi
आता रेशन दुकानातून छोटे सिलिंडर खरेदी करता येणार!
➡️नागरिकांच्या सोयीसाठी सरकारकडून काही योजना लाँच केल्या जातात, तर काही जुन्या योजनांमध्ये सुधारणा केली जाते. तुम्ही तुमच्या घरामध्ये छोटा एलपीजी गॅस सिलेंडर वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण सरकार आता रेशन दुकानांच्या माध्यमातून छोट्या एलपीजी गॅस सिलेंडरची विक्री करण्याचा विचार सरकार करत आहे. ➡️सरकारने या निर्णयावर शिक्कामोर्तब केल्यास सामान्यांना मोठा फायदा होऊ शकतो. त्यांना एलपीजी गॅस सिलेंडर सहजपणे उपलब्ध होऊ शकतो. ऑइल मार्केटिंग कंपन्यांच्या प्रतिनिधींनी देखील सरकारी रेशन दुकानांमधून लहान एलपीजी सिलेंडरच्या किरकोळ विक्रीच्या प्रस्तावाचे कौतुक केले. ➡️रेशन दुकान आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यावर भर बैठकीत केंद्रीय अन्न सचिव पांडे यांनी रेशन दुकाने अधिक आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यावर भर दिला. दरम्यान या बैठकीत रेशन दुकानाबाबत आणखी एक मुद्दा राज्य सरकारांकडून मांडण्यात आला. तो म्हणजे कॉमन सर्व्हिस सेंटर च्या मदतीने या दुकानांची आर्थिक उपयुक्तता वाढवता येईल, असे राज्य सरकारांनी सुचवले. अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- TV9 Marathi, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
35
4