AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
 आता फक्त 40 हजारांत खरेदी करता येणार इलेक्ट्रिक स्कूटर!
ऑटोमोबाईलAgrostar
आता फक्त 40 हजारांत खरेदी करता येणार इलेक्ट्रिक स्कूटर!
➡️सध्या पेट्रोल डिझेलचे वाढते भाव सर्वसामान्य लोकांना परवडेना झालेत. त्यामुळे अनेक लोक इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत असताना पाहायला मिळत आहेत. लोकांचा कल लक्षात घेता कंपन्यांनी देखील EV मध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. Tata Motors, Mahindra, MG Motors, Hyundai सारख्या प्रमुख कार कंपन्यांनी त्यांची उत्पादने लाँच केली आहेत. आजकाल ऑटो मार्केटमध्ये एकापेक्षा जास्त इलेक्ट्रिक वाहने लॉन्च होत आहेत, ज्यामुळे लोकांचा वेग देखील याकडे आहेत. ➡️जर तुम्हाला कमी किंमतीत खास इलेक्ट्रिक बाईक घरी आणायची असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची ठरत आहे. आजकाल ऑटो मार्केटमध्ये इलेक्ट्रिक कार, स्कूटर किंवा बाईकची मागणी खूप जास्त आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकाला स्वतःसाठी एखादी इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करायची असते, जेणेकरून पेट्रोलच्या महागड्या खर्चातून दिलासा मिळू शकेल. विशेष महानजे ही इलेक्ट्रिक स्कूटर चालवण्यासाठी तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स किंवा रजिस्ट्रेशन असण्याची गरज नाही. ➡️इव्होलेट पोनी इलेक्ट्रिक स्कूटरची वैशिष्ट्ये : इव्होलेट पोनी ही स्कूटर भारतातील सर्वात स्वस्त स्कूटरपैकी एक आहे. लोकांनाही ही स्कूटर खूप आवडते. इव्होलेट पोनी 48V/28Ah VRLA बॅटरीसह येते, तर पोनी क्लासिक 48V/25Ah लिथियम-आयन बॅटरीसह येते. ➡️इव्होलेट पोनीमध्ये वॉटरप्रूफ बीएलडीसी मोटरने सुसज्ज असण्यासोबतच, कंपनी 250 वॅट्स पॉवर देखील निर्माण करते. इव्होलेट पोनी एका चार्जवर सुमारे 90-120 किमीची रेंज देते. ही इव्होलेट पोनी मोटर बाईक दोन प्रकारात उपलब्ध आहे. यापैकी एक लीड ऍसिड बॅटरी, जी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 8-9 तास घेते. तसेच दुसरी आहे ती बाईक लिथियम-आयन बॅटरी, ही बाईक पूर्णपणे चार्ज होण्यासाठी फक्त 3-4 तास लागतात. ➡️किंमत आणि रंग पर्याय : इव्होलेट पोनी ची सुरुवातीची किंमत 39,542 रुपये आहे, तर क्लासिक प्रकाराची सुरुवातीची किंमत 49,592 रुपये आहे. हे इलेक्ट्रिक पर्याय म्हणून अनेक IoT वैशिष्ट्यांसह उपलब्ध आहे. कलर ऑप्शन्सबद्दल बोलायचे झाले तर ही स्कूटर पांढऱ्या, काळा, लाल, निळ्या आणि सिल्व्हर कलरमध्ये उपलब्ध आहे. ➡️संदर्भ: Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
139
26