AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
आठ रुपयात 71 किलोमीटरचा प्रवास करता येणार!
शेतीतील नवा शोध!Saam TV
आठ रुपयात 71 किलोमीटरचा प्रवास करता येणार!
➡️ पेट्रोल- डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. दिवसेंदिवस इंधनाचे दर वाढतच आहेत. पेट्रोलच्या दराने शंभरी पार केली आहे. यामुळे आता सर्वसामान्यांना मोटर सायकल चालवणे परवडत नाही. ➡️ यामुळे अनेकजण ईलक्ट्रीकल व्हेईकलकडे पर्याय म्हणून पाहत आहेत. पण याच्या किमती आवाक्या बाहेर गेल्या आहेत. याला पर्याय म्हणून नागपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्याने स्वस्तात ‘ई-बायसिकल’ तयार केली आहे. ➡️ ही बायसिकल ८ रुपयात ७१ किलोमीटर धावते. याचा वेग २५ ते २८ किलोमीटर आहे. यामुळे ही बायसिकल सर्वसामान्यांना परवडणारी आहे. तसेच पेट्रोल आणि डिझेलमुळे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होत असल्याने त्यापासून पर्यावरणाला वाचविण्यासाठी पेट्रोल व इंधनावर चालणाऱ्या वाहनांचा वापर कमी करावा लागणार आहे. बॅटरी, चार्जर आणि मोटरचा उपयोग ➡️ सर्वाधिक ई-बाईक वापरण्यावर नागरिक भर देत आहेत. याच संकल्पनेचा विचार करुन महाविद्यालयातील यांत्रिकी विभागाच्या अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांनी प्रकल्प म्हणून बटरी, चार्जर आणि मोटरच्या उपयोग करीत ही ई-बायसिकल तयार केली' असल्याचे प्राचार्य डॉ. अमोल देशमुख यांनी सांगितले. ७१ किलोमीटरसाठी फक्त 1 युनिट वीज ➡️ ई-बायसिकल २५ ते २८ कि.मी. ताशी वेगाने धावते. ७१ किलोमीटरसाठी फक्त १ युनिट वीज वापर खर्च करते. १ युनिट चार्जिंगसाठी अंदाजे ८ ते ९ रुपयांचा खर्च येतो. विशेष म्हणजे ही सायकल ८० ते ९० किलो वजनापर्यंत सहजरित्या २५ किलोमीटर प्रतितास या वेगाने चालू शकते, अशी माहिती महाविद्यालयातील विभाग प्रमुख डॉ. नितीन मांडवगडे यांनी दिली. संदर्भ:- Saam TV, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
66
7