AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
आजच करा जनधन खात्याशी आधार लिंक, मिळतील 💸५००० रुपये!
कृषी वार्तान्यूज18
आजच करा जनधन खात्याशी आधार लिंक, मिळतील 💸५००० रुपये!
प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत देशातील गरिबांचे खाते हे शून्य रक्कमेसह (Zero balance) बँक, पोस्ट ऑफिस आणि राष्ट्रीयकृत बँकांमध्ये उघडलं जातं. या योजनेअंतर्गत उघडण्यात आलेल्या खात्यावर ग्राहकांना अनेक सुविधा उपलब्ध आहेत. सगळ्यात खास वैशिष्ट्य म्हणजे तुमच्या खात्यामध्ये जरी पैसे नसले तरी तुम्ही ५ हजार रुपये बँकेतून काढू शकता. नागरिकांना आर्थिक नफा देणारी ही योजना सगळ्यांच्या फायद्याची आहे. जाणून घेऊयात नेमकी काय आहे ही योजना आणि कसा मिळवाल फायदा. कसे 🤔 मिळणार 5 हजार रुपये प्रधानमंत्री जनधन योजनेचा लाभ फक्त त्याच नागरिकांना मिळेणार त्यांचं अकाऊंट आधारशी लिंक आहे. या योजनेत ग्राहकांना अकाऊंटमधून ५००० रुपये ओव्हरड्राफ्ट करण्याची सुविधा मिळते. पण याचा फायदा करून घेण्यासाठी तुमचं अकाऊंट हे आधारशी लिंक असं आवश्यक आहे. देशातल्या प्रत्येक नागरिकाचं बँकेमध्ये खातं असावं आणि त्यांना आर्थिक मदत व्हावी असं या योजनेचं उद्दिष्ट आहे. या योजनेअंतर्गत तुम्ही १० वर्षांखालील मुलाचंही खातं उघडू शकता. काय 🤔आहे ओव्हरड्राफ्ट सुविधा? ओव्हरड्राफ्ट सुविधेमध्ये खातेधारक तेव्हाच पैसे काढू शकतो, जेव्हा त्याच्या खात्यात पैसे नसतील. म्हणजे ग्राहकाच्या खात्यामध्ये शुन्य बॅलेंस असेल तेव्हा या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सुविधेचा लाभ घेण्यासाठीदेखील तुम्हाला आधार अकाऊंटशी लिंक असणं महत्त्वाचं आहे. ओव्हरड्राफ्ट सुविधेचा लाभ घेण्यासाठीच्या अटी 👇 या सुविधेच लाभ घेण्यासाठी खातेधारकाला पहिल्या ६ महिन्यापर्यंत खात्यामध्ये पुरेसे पैसे ठेवणं आवश्यक आहे. या दरम्यान, ग्राहकांना बँकेत वेळीवेळी व्यवहारही करावा लागेल. अशा खातेधारकांना बँकेकडून डेबिट कार्ड दिलं जातं, ज्याने तुम्ही खात्यामध्ये व्यवहार करू शकता. खातं उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्रं 🧾 प्रधानमंत्री जनधन योजनेत खातं उघडण्यासाठी आधार कार्ड किंवा पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग परवाना किंवा PAN कार्ड द्यावं लागेल तर मतदार कार्ड, NREGA जॉब कार्ड, प्राधिकरणाकडून जारी केलेले पत्र ज्यामध्ये तुमचं नाव, पत्ता आणि आधार नंबर लिहिलेला असतो. गजेटेड आफिसरद्वारे दिलेलं पत्र ज्यामध्ये खाते उघडण्यासाठी प्रमाणित फोटो असतो. नवं खातं उघडण्यासाठी काय 🤔 करावं? जर तुम्ही प्रधानमंत्री जनधन योजनेत खात उघडण्यासाठी इच्छूक असाल तर नजिकच्या बँकेमध्ये तुम्ही सहजपणे खातं उघडू शकता. यासाठी तुम्हाला बँकेत फॉर्म भरावा लागेल. ज्यामध्ये तुमचं नाव, मोबाइल नंबर, बँकेच्या शाखेचं नाव, अर्जदाराचा पत्ता, नामनिर्देशित, व्यवसाय / रोजगार आणि वार्षिक उत्पन्न आणि अवलंबून असलेल्यांची संख्या, एसएसए कोड किंवा प्रभाग क्रमांक, गाव कोड किंवा शहर कोड अशी माहिती द्यावी लागेल. संदर्भ - १४ ऑक्टोबर २०२० न्यूज १८, यासारख्या अधिक महत्वाच्या व कृषी विषयक घडामोडी जाणून घेत रहा व माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
143
7
इतर लेख