गुरु ज्ञानAgroStar
आंबा पिकातील मोहर अवस्थेतील नियोजन!
👉🏻सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे आंबा पिकात मावा, तुडतुडे, मिजमाशी, भुरी आणि करपा यांसारख्या किडी व रोगांचा प्रादुर्भाव होतो. यामुळे मोहोर गळण्याचे प्रमाण वाढते, परिणामी उत्पादनात घट होते. यावर प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक आहे.
👉🏻पहिली फवारणी:
कीड नियंत्रणासाठी थायोमिथॉक्साम घटक असलेले क्रुझर कीटकनाशक @0.5 ग्रॅम आणि रोग नियंत्रणासाठी कार्बेनडॅन्झिम 12% + मॅंकोझेब 63% डब्लूपी घटक असलेले मँडोझ बुरशीनाशक @2.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
👉🏻दुसरी फवारणी:
परागीकरण वाढवून मोहोर गळ कमी करण्यासाठी नॅनोवीटा CA 11 @1.5 मिली व नॅनोवीटा B 10 @1.5 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
👉🏻लाभ:
- किडी व रोगांचे प्रभावी नियंत्रण.
- मोहोर गळ कमी होऊन परागीकरण सुधारते.
- फुलांची टिकवणक्षमता वाढते व उत्पादनात सुधारणा होते.
👉🏻यामुळे आंबा पिकाचे संरक्षण करून अधिक उत्पादन घेतले जाऊ शकते. योग्य वेळी उपाययोजना केल्यास नुकसान टाळता येते.
👉🏻संदर्भ : AgroStar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.