AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
आंबा पिकातील मोहर अवस्थेतील नियोजन!
सल्लागार लेखअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.
आंबा पिकातील मोहर अवस्थेतील नियोजन!
➡️ मोहोर दिसायला लागल्यावर 20% मोहोर दिसायला लागला की पाणी देणे सुरु करावे , हे अत्यावश्यक आहे. ➡️ मोहोर दिसताच सर्व रासायनिक कीटकनाशक फवारणी पुढील महिनाभर म्हणजे मोहोर सेटिंग होईपर्यंत पूर्ण पणे बंद कराव्यात सेटिंग झाल्या नंतर रासायनिक उपाययोजना सूरु करावी. ➡️ मधमाश्यांनि बागेत येण्यासाठी पिवळी फुले असलेली फुलझाडे लावावीत जसे कि झेंडूची पण हि झाडे मोहर येण्यापूर्वी १.५ महिन्यापूर्वी लावावी जेणेकरून मोहर आल्यावर त्या झाडांना फुले असावीत . ➡️ मोहोरावर भुरी येऊ नये म्हणून जैविक मध्ये ट्रायकोडर्मा ची फवारणी घ्यावी अथवा रासायनिक मध्ये हेक्झाकोनॅझोल 10 मिली १० लिटर ला फवारणी करावी. ➡️ गळ टाळण्यासाठी बाजरीच्या आकारांचे फळ दिसताच त्यावर होल्ड ऑन (NAA) च्या दर आठवड्याला एक प्रमाणे 2- 3 फवारणी घ्याव्यात. ➡️ वाटण्या एवढे फळ असताना युरिया 2 ग्राम / 1 लिटर पाण्यात फवारणी घ्यावी. त्यामुळे पण फळगळ थांबण्यास मदत होते. ➡️ मोहोर सुरु झाल्यावर बागेला खत देणे सुरु करावे. या काळात जमीन उकरून खत देऊ नये. 19:19:19 साऱखी संतुलित खते देता येतील ती वरूनच टाकावी व त्यावर शेणखत टाकावे. पुढे कल्टार देण्याच्या एक महिना अगोदर पर्यंत खत प्रत्येक महिन्यात साधारण सम प्रमाणात द्यावीत. एकदम खत देणे योग्य नाही. ➡️ मोहोर सेटिंग नंतर बोरॉन, कॅल्शियम, झिंक ही सूक्ष्म अन्नद्रव्य फवारणी घ्यावी. जास्त फळ सेटिंग झाली तर फळांची विरळणी आवश्यक आहे ➡️ चांगल्या सेटिंग साठी मधमाशी पेट्या बागेत ठेवणे फायदेशीर ठरते. प्रयत्न करावे की जास्तीत जास्त मधमाश्या बागेमध्ये येतील व परागीभवनाला मदत होईल . ➡️ फळे वाटाण्याएवढी सेट झाल्यानंतर झाडाचा पाण्याचा ताण हळू हळू तोडायचा म्हणजे सुरुवातीला प्रति झाड १ लिटर पाणी द्यावे , पुन्हा ३ दिवसांनी २ लिटर म्हणजे हळू हळू पाणी वाढवायचे असा करत झाडाचा ताण तोडायचा आहे . जर तुम्ही जास्त पाणी दिले तर फळ गळ होऊ शकते . ·सर्व शेतकऱ्यांनी डायरी मद्ये कल्टार दिलेची तारीख, झाडाला मोहोर सुरु झालेची तारीख, इतर व्यवस्थापन याच्या नोंदी ठेवाव्यात. हे फार आवश्यक आहे. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
26
9
इतर लेख