AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
आंबा पिकातील तुडतुडे कीड नियंत्रण
गुरु ज्ञानAgroStar
आंबा पिकातील तुडतुडे कीड नियंत्रण
👉🏻आंबा पिकावर तुडतुड्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात नुकसान करणारा ठरतो. हे कीटक कोवळ्या पानांतील, लहान फांद्यांतील, व विशेषतः मोहरातील रस शोषून घेतात, ज्यामुळे मोहोर गळतो आणि फळधारणेपूर्वीच पिकाचे नुकसान होते. तुडतुडे मधासारखा चिकट पदार्थ पानांवर व मोहोरावर टाकतात, ज्यामुळे काळी बुरशी जमा होऊन प्रकाश संश्लेषण प्रक्रियेवर परिणाम होतो. मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्यास आंबा उत्पादनात 50% पर्यंत घट होऊ शकते. 👉🏻उपाययोजना: 1. झाडाच्या आतील फांद्यांची विरळणी करा, जेणेकरून सूर्यप्रकाश आत पोहोचेल व हवा खेळती राहील. 2. फांद्यांवरील अनावश्यक पालवी काढा, कारण जास्त दाटपणामुळे तुडतुड्यांच्या वाढीस पोषक वातावरण तयार होते. 3. तुडतुड्यांचा प्रादुर्भाव दिसून आल्यास टोल्फेनपायरॅड 15% ईसी घटक असणारे झेनिथ कीटकनाशक @2.5 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करा. 👉🏻ही उपाययोजना केल्याने तुडतुड्यांचा प्रादुर्भाव नियंत्रित करता येतो व पिकाचे नुकसान टाळून उत्पादनात वाढ करता येते. योग्य व्यवस्थापनाने तुडतुड्यांचा प्रभावी प्रतिकार करा आणि आंबा पिकाची गुणवत्ता व उत्पादन टिकवा. 👉🏻संदर्भ : AgroStar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
9
0
इतर लेख