AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
आंतरपीक घेताना घ्यावयाची काळजी
गुरु ज्ञानAgroStar
आंतरपीक घेताना घ्यावयाची काळजी
👉🏻आंतर पीक म्हणजे एकाच शेतात एकाच वेळी दोन किंवा अधिक पिके घेण्याची पद्धत. ही पद्धत शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरते कारण दोन पिकांचे उत्पादन मिळाल्याने नफा वाढतो आणि संसाधनांचा जास्तीत जास्त उपयोग होतो. जैविक किंवा अजैविक ताणामुळे एका पिकाचे नुकसान झाले तरी दुसऱ्या पिकामुळे आर्थिक नुकसान कमी होते. 👉🏻तथापि, योग्य नियोजन न केल्यास आंतर पिकामुळे समस्या निर्माण होऊ शकतात. उदा., एकाच प्रकारच्या कीड किंवा रोगाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका, मुख्य पिकाचे अन्नद्रव्ये आणि पाणी कमी होणे, तसेच दोन्ही पिकांच्या काढणीची अडचण होऊ शकते. 👉🏻आंतर पिकाचे फायदे घेण्यासाठी काही महत्त्वाच्या बाबींची काळजी घेणे गरजेचे आहे. उदा., भिन्न वर्गातील पिकांची निवड, लांब कालावधीच्या पिकासोबत कमी कालावधीच्या पिकांची लागवड, तसेच सरळ वाढणाऱ्या पिकांमध्ये बुटकी व पसरट वाढणाऱ्या पिकांची निवड. 👉🏻पेरणीपूर्वी योग्य नियोजन आणि पिकांमधील संसाधनांची योग्य विभागणी केल्यास आंतर पिकामुळे उत्पादनात लक्षणीय वाढ होऊ शकते आणि शेती अधिक फायदेशीर ठरते. 👉🏻संदर्भ : AgroStar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
15
0
इतर लेख