AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
असे करा, आंबा मोहोर संरक्षण!
सल्लागार लेखअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
असे करा, आंबा मोहोर संरक्षण!
➡️आंब्याच्या झाडांना मोहोर फुटण्याच्या वेळी, आंबा मोहोरामधील तुडतुडे, कोळी, मिजमाशी, पिठ्या ठेकूण इ. किडी तसेच करपा, भुरी इ.रोगांचा प्रादुर्भाव कमी करणे आवश्यक आहे. मोहोर फुटल्यानंतर जर फवारणी केली तर किडीचे नियंत्रण करणे अवघड जाते.यासाठी खालीलप्रमाणे फवारणी नियोजन करावे. मोहोराचे संरक्षण (फवारणी) 1) पहिली फवारणी (पोपटी रंगाच्या पालवीवर मोहोर येण्यापूर्वी) - डेल्टामेथ्रीन 2.8% ईसी – 0.5 मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन फवारणी करावी. 2) दुसरी फवारणी (बॉंगे फुटताना ) - लॅम्बडा सहालोथ्रीन 5% ईसी 0.5 मिली आधिक हेक्साकोनॅझोल 5% ईसी 1 मिली लिटर पाणी याप्रमाणे घेऊन फवारणी करावी. 3) तिसरी फवारणी ( दुसऱ्या फवारणी नंतर १५ दिवसांनी ) - इमिडाक्लोप्रिड 17.8 % एस एल – 2.4 मिली आधिक कार्बेनडीझम 12% + मॅन्कोझेब 63% डब्ल्यू पी - 2 ग्रॅम. लिटर पाणी याप्रमाणे घेऊन फवारणी करावी. 4)चौथी फवारणी (तिसऱ्या फवारणी नंतर 15 दिवसांनी ) थायोमेथोक्साम 25% डब्ल्यू जी 0.5 ग्रॅम अधिक झिनेब 68% + हेक्साकोनॅझोल 4% डब्ल्यू पी 2 ग्रॅम लिटर पाणी याप्रमाणे घेऊन फवारणी करावी. अशा पद्धतीने व्यवस्थापन केल्यास उत्पादकता तसेच उत्पादनाचा दर्जा सुधारण्यास नियमितपणे मदत होते. संदर्भ:-अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
18
6
इतर लेख