AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
 अनुदानासाठी ऑनलाइन नावनोंदणी  केवळ २३ रुपये ६० पैशांत!
कृषी वार्तासकाळ पेपर
अनुदानासाठी ऑनलाइन नावनोंदणी केवळ २३ रुपये ६० पैशांत!
👉ऑनलाइन अर्जासाठी (Online registration) वेगवेगळी पोर्टल्स असल्याने शेतकरी संभ्रमात पडतात. त्याचा फायदा दलाल-मध्यस्थ उचलतात. शेतकऱ्यांना (Farmer) कोणाच्याही मदतीशिवाय विविध योजनांसाठी अर्ज करण्याची सुविधा मिळण्यासाठी एक ऑनलाइन पोर्टल कृषी विभागाने तयार केले आहे. त्यावर विविध योजना, अनुदानासाठी अर्ज करणे सोपे ठरणार आहे. 👉शेतकऱ्यांना कोणाच्याही मदतीशिवाय विविध योजनांसाठी अर्ज करण्याची सुविधा मिळण्यासाठी एक ऑनलाइन पोर्टल कृषी विभागाने तयार केले आहे. कृषी आयुक्त धीरज कुमार व सहकारी या पोर्टलची उपयुक्तता वाढविण्यासाठी परिश्रम घेत आहेत. या पोर्टलवर फक्त एकदाच नोंदणी केल्यानंतर शेतकरी वेगवेगळ्या अनुदान योजनांसाठी अर्ज करू शकतात. शेतकऱ्यांनी सर्वप्रथम ऑनलाइन नावनोंदणी तातडीने करून घेण्याची आवश्यकता आहे. योजनेसाठी अर्ज कसा भराल? 👉आधी सांगितल्याप्रमाणे https://mahadbtmahait.gov.in/ या वेबसाइटवर तुम्ही तुमची नावनोंदणी केली व शेवटी यशवीरित्या झाल्याचा चा संदेश आला, की तुम्ही अर्ज भरण्यासाठी पात्र ठरतात. आता तुम्हाला मिळालेल्या ‘यूझर नेम’द्वारे किंवा ‘आधार क्रमांक’ टाकून देखील ‘लॉग-इन’ करता येईल. (समजा आधार क्रमांक नसला तर केवळ ‘यूझर आयडी’ने देखील अर्ज भरता येतो. परंतु अनुदानासाठी तुम्ही पात्र ठरलात, तर अनुदान आधार संलग्न बॅंक खात्यात जमा होते. आधार नंबर नसल्यास गावातील सार्वजनिक सुविधा केंद्रावर चौकशी करावी. 👉योजनेकरिता अर्ज भरण्यासाठी तुम्हाला आधी ‘नावनोंदणी’ करून मिळवलेला ‘यूझर नेम’ व ‘पासवर्ड’ टाकावा लागेल. त्यानंतर ‘नवीन नोंदणी’ असे पान उघडते. “तुमच्याकडे आधार क्रमांक आहे का,” असा प्रश्न तुम्हाला उजव्या बाजूला विचारला जाईल. आधार कार्ड असल्यास ‘होय’वर क्लिक करावे. त्यानंतर आधार नंबर काळजीपूर्वक टाकावा. या नंबरचे देखील प्रमाणीकरण (Verification) आपोआप होते. ते करण्याचे दोन प्रकार आहे. ‘👉बायोमेट्रिक’ पद्धती : शेतकऱ्याने आधार कार्ड काढताना बोटाचे ठसे दिलेले असतात. त्यांच्या आधारे येथे ‘बायोमेट्रिक’ प्रमाणीकरण होते. ‘बायोमेट्रिक’ करायचे नसल्यास ‘ओटीपी’वर क्लिक करावे. 👉ओटीपी’ पद्धत : पूर्वीप्रमाणे मोबाईल येणारा ओटीपी क्रमांक भरावा. तुम्ही क्लिक करताच ‘तुमचा आधार क्रमांक व त्यातील वैयक्तिक माहिती साठवली जात आहे. राज्य सरकारच्या नियमानुसार ही माहिती वेळोवेळी वापरण्यास माझी हरकत नाही’, अशी एक ओळ येते. तिथे OK क्लिक करावे. त्यानंतर तुमचे लॉग-इन पूर्ण होते. यानंतर काही वेळा पोर्टलवर ‘तुमचे प्रोफाइल पूर्ण नाही,’ असा संदेश देखील येऊ शकतो. 👉अशा वेळी तुमचे पूर्ण नाव, बॅंक खाते क्रमांक, आयएफएससी कोड टाकावा. त्यानंतर बॅंक शाखेचे नाव आपोआप येते. यानंतर “योजनेअंतर्गत शासनातर्फे देण्यात येणारे अनुदान आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. याची कल्पना मला असून मी नमूद केलेले बँक खाते आधार संलग्न केलेले आहे.” अशी एक ओळ दिसते. तेथील बॉक्समध्ये ‘टिक’ क्लिक करावे. खालील ‘जतन करा’ या हिरव्या शब्दांवर पुन्हा क्लिक करावे. त्यानंतर पत्ता विचारला जातो. तेथेही सर्व माहिती व्यवस्थित भरावी. 👉 वैयक्तिक माहिती भरताना ‘शेतजमिनीचे तपशील’ असे पान उघडते. त्यावर तपशील बिनचूक द्यावेत. सातबारा उतारा, ‘आठ-अ’मधील नोंदी तेथे द्याव्या लागतात. वैयक्तिक मालकीची जमीन, संयुक्त मालकीची जमीन याचीही नोंद करावी. जमिनीनंतर पिकाची माहिती देखील भरावी. आंतरपिके, बारमाही पिके, एकल पिके, नापिक क्षेत्र अशी विविध माहिती द्यावी लागते. 👉सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला उपलब्ध योजनेपैकी कशाचा लाभ हवा आहे, त्या योजनेवर क्लिक करावे. तुम्ही क्लिक करताच तो अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होते. विविध योजनेत आवश्यकतेनुसार वेगवेगळी माहिती विचारलेली असते. ती व्यवस्थित भरून Submit वर क्लिक करावे. येथे एकापेक्षा अनेक योजनेसाठी एकाच वेळी क्लिक करून विविध अर्ज भरता येतात. 👉म्हणजेच शेवटी केवळ २३ रुपये ६० पैसे भरून तुम्ही तुमचा ऑनलाइन अर्ज कृषी खात्याकडे देत असतात. तो अर्ज आपोआप हस्तांतरित होतो. ही प्रक्रिया पूर्ण होताच आपला अर्ज लॉटरी प्रक्रियेसाठी पात्र ठरतो. अर्ज लॉटरीला प्राप्त झाला म्हणजे तुम्हाला अनुदान मिळणार असे नसून, लॉटरीत नाव निघाले तरच अनुदान मिळते. पण, समजा लॉटरी नाव निघाले नाही तरी तुमचा अर्ज दुसऱ्या वेळी आहे तसाच पात्र धरला जाऊ शकतो. त्यामुळे ऑनलाइन नावनोंदणी यापुढे महत्त्वाची ठरणार आहे. 👉अर्ज भरताना ही कागदपत्रे हाताशी ठेवावी स्वतःचा मोबाईल नंबर, आधार कार्ड, सातबारा उतारा, आठ-अ उतारा, शेतकरी अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीमधील असल्यास ‘जातीचा दाखला’, बॅंकेचे पासबुक, उत्पन्न तपशील, अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट इ. संदर्भ - सकाळ पेपर, यासारख्या अधिक महत्वाच्या व कृषी विषयक घडामोडी जाणून घेत रहा व माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
136
6