AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
शेतकऱ्यांना अर्थसंकल्प देणार दिलासा!
कृषि वार्ताअॅग्रोवन
शेतकऱ्यांना अर्थसंकल्प देणार दिलासा!
नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकार यांच्या कार्यकाळातील अखेरचा अर्थसंकल्प १ फेब्रुवारी २०१९ रोजी सादर करणार आहे, त्यासाठी संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून सुरू होणार आहे. हे अधिवेशन १३ फेब्रुवारीपर्यंत चालेल. अर्थमंत्री अरुण जेटली हा अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील, मात्र त्यानंतर सत्तेवर येणारे नवीन सरकार निवडणुकीनंतर संपूर्ण अर्थसंकल्प सादर करेल. हंगामी अर्थसंकल्पावरून अर्थमंत्रालयातील तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. जेटलींकडून हंगामी अर्थसंकल्पात शेतकरी आणि मध्यमवर्गीय वर्गासाठी काही आकर्षक योजना होण्याची शक्यता आहे.
मध्यमवर्गीयांसाठदेखील प्राप्तिकर मर्यादा वाढवण्याची शक्यता असून, गृहकर्जदारांनादेखील दिलासा दिला जाऊ शकतो. सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आगामी अर्थसंकल्प हा मध्यमवर्गीय आणि नोकरदारांसाठी अनेक सवलती देणारा ठरण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्प अंतरिम असल्याने अर्थसंकल्पात मोठे निर्णय अथवा घोषणा केल्या जात नाहीत. संदर्भ – अॅग्रोवन, ११ जानेवारी २०१९
115
0