AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
हुमणी किडीचा जीवनक्रम
किडींचे जीवनचक्रअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
हुमणी किडीचा जीवनक्रम
उष्णकटिबंधीय प्रदेशामधे हुमणी किटकाचा प्रादुर्भाव दिसुन येतो. ऊस लागवडीचे वाढते क्षेत्र, एकरी पीकपद्धती, प्रजाती विविधतेचा अभाव, खोडवा पद्धती यामुळे किडीचा प्रसार झपाट्याने होत आहे. किडीचा जीवनक्रम या किडीच्या अंडी-अळी-कोष-भुंगे अशा चार अवस्था आहेत. पहिल्या मान्सूनच्या सरीनंतर हुमणीचे प्रौढ भुंगे संध्याकाळच्या वेळी जमिनीतून कोशावस्थेतून बाहेर येतात आणि कडुलिंब, बाभुळ, विलायती बाभुळ, बोर इत्यादी वनस्पतींची पाने खातात आणि त्याच झाडावर या किडीचे नर मादी मिलन होते, त्यानंतर मादी जमिनीमध्ये अंडी घालते. साधारणपणे एक मादी ५० ते ६० अंडी घालते व १५ ते १८ दिवसात अंडी उबतात. अळीची पहिली अवस्था ६० ते ९० दिवस, दुसरी अवस्था ५५ ते ११० दिवस व तिसरी अवस्था ४ ते ५ महिने असते. तिसऱ्या अवस्थेतील पूर्ण वाढ झालेली अळी जमिनीत ७० सें.मी खोल, कोशावस्थेमध्ये (२० ते २२ दिवस) जाते. अशा पद्धतीने एक पिढी पूर्ण होण्यास साधारणपणे एक वर्षाचा कालावधी लागतो.
नुकसानीचे स्वरूप या किडीची अळी प्राथमिक अवस्थेमध्ये जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे सेवन करते व नंतर ऊस पिकाच्या मुळावर छिद्रे करून मुळे पूर्णपणे नष्ट करते. प्रादुर्भावग्रस्त झाडांची पाने पिवळी पडतात व झाडे सुकल्यासरखी दिसतात. जैविक नियंत्रण: १) अळी सुरूवातीला सेंद्रीय पदार्थावर जगते तेव्हा खरीप हंगामात जमिनीत शेणखत टाकताना खताबरोबर हेक्टरी 25 किलो मेटारायझम किंवा बिव्हेरिया बुरशी मिसळून टाकावी. २) पिकास पाणी दिल्यानंतर ही बुरशी शेणखतात मिसळुन सरीमध्ये ऊस पिकाच्या मुळाजवळ द्यावी. रासायनिक नियंत्रण: १) मान्सूनच्या पहिल्या सरीनंतर हुमणीचे भुंगे कडुलिंबाच्या झाडाकडे आकर्षित होतात अशा वेळी त्या झाडावर कार्बोफ्युरॉन ची फवारणी करावी. जर आपणास ही माहिती आपल्यासाठी उपयुक्त वाटली असेल तर ती लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांसह शेयर करा "
107
6