क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
कृषी वार्तान्यूज १८लोकमत
WhatsApp वरून एक मेसेज करून सेकंदात बुक करा Gas Cylinder; पाहा नंबर आणि प्रोसेस
➡️ गॅस सिलिंडर बुक करायचा असेल तर अनेक जण एकतर फोन करून किंवा आपल्या एजन्सीकडे जाऊन गॅस बुक करतात. परंतु आता या पद्धती काळाप्रमाणे जुन्या झाल्या आहेत. ➡️ आता तुमच्या स्मार्टफोनवरून आणि त्यातच विशेष म्हणजे तुमच्या व्हाट्सअँप ​क्रमांकावरून गॅस बुक करण्याची सुविधा ग्राहकांना मिळणार आहे. ➡️ देशातील सर्वात मोठ्या पेट्रोलियम कंपन्या भारत गॅस, इंडेन गॅस आणि एचपी गॅस या आपल्या ग्राहकांना WhatsApp द्वारे गॅस सिलिंडर बुक करण्याची सुविधा देत आहेत. ➡️ सेकंदात आपण व्हॉट्सअ‍ॅपवरुन गॅस बुकिंग कसे करू शकता आणि बुकिंगसाठी कोणत्या क्रमांकांचा वापर करता येतो ते पाहूया. ➡️ इंडेन गॅसचे ग्राहक ७५८८८८८८२४ नंबरवर बुकिंग करू शकतात. ग्राहकांनी त्यांच्या मोबाईलमध्ये हा नंबर ७५८८८८८८२४ सेव्ह करावा. ➡️ यानंतर WhatsApp ओपन करा आणि तुमच्या रडिस्टर्ड मोबाईल क्रमांकावरून बुक किंवा REFILL# असा मेसेज लिहून पाठवा. ➡️ REFILL# असं लिहून मेसेज पाठवल्यास ऑर्डर पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला एक मेसेज येईल. रिप्लायमध्ये बुकिंग केलेला गॅस सिलिंडर तुमच्यापर्यंत कधी पोहोचेल याची माहिती असेल. ➡️ भारत गॅस च्या बुकिंगसाठी तुम्हाला १८००२२४३४४ हा नंबर सेव्ह करावा लागेल. नंबर सेव्ह केल्यानंतर तुम्हाला WhatsApp वर जावं लागेल. ➡️ त्यानंतर सेव्ह केलेल्या नंबरवर हाय(Hi ) किंवा हॅलो( hello )असा मेसेज पाठवा. त्यानंतर तुम्हाला कंपनीकडून एक ऑटो रिप्लाय येतील. ➡️ जेव्हा तुम्हाला सिलिंडर बुक करायचा असेल तेव्हा केवळ त्यावर बुक असं टाईप करून पाठवा. तो मेसेज पाठवल्यानंतर तुम्हाला ऑर्डर डिटेल आणि गॅस सिलिंडर कधी मिळेल याची माहिती मिळेल. ➡️ एचपी गॅस च्या ग्राहकांसाठी ९२२२२०११२२ हा नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करावा लागेल. हा नंबर सेव्ह केल्यानंतर तुमचं व्हाट्सअँप सुरू करा. ➡️ त्यानंतर सेव्ह केलेल्या क्रमांकावर Book असं लिहून मेसेज पाठवा. ➡️ मेसेज पाठवल्यानंतर तुम्हाला तुमच्या क्रमांकावर ऑर्डर डिटेल्स मिळतील. तसंच तुमचा गॅस सिलिंडर कधी डिलिव्हर होईल याची माहितीही मिळेल. ➡️ ग्राहकांच्या सुविधेसाठी गॅस कंपन्यांकडूनही सुविधा सुरू करण्यात आली आहे. एचपी, इंडेन आणि भारत गॅसचे ग्राहक या सुविधेचा लाभ घेऊ शकतात ➡️ गॅस सिलिंडर बुक करताना तुम्हाला त्याच नंबरवरून मेसेज करावा लागेल जो एजन्सीडे रजिस्टर्ड आहे. कोणत्याही रजिस्टर नसलेल्या नंबरवरून बुकिंग करता येणार नाही. यासारख्या अधिक उपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020क्लिक करा. संदर्भ -लोकमत, यासारख्या अधिक महत्वाच्या व कृषी विषयक घडामोडी जाणून घेत रहा व माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया खाली कंमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा.
42
12
संबंधित लेख