AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
आपणास सापळा पिकांबद्दल माहिती आहे का?
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
आपणास सापळा पिकांबद्दल माहिती आहे का?
• प्रमुख पिकांवर किडींचा प्रादुर्भाव होउ नये म्हणुन त्या शेजारी लावण्यात येणाऱ्या पिकांस सापळा पिके म्हणतात. • सापळा पीक हे मुख्य पिकाच्या शेतातील कालावधीत सुरवातीपासून ते अखेरपर्यंत किडींना आकर्षित करणारे असावे. यामुळे मादी पतंग मुख्य पिकाच्या तुलनेत सापळा पिकावर अंडी देते. • या सापळा पिकांमुळे मुख्य पिकावर होणार किडींचा प्रादुर्भाव टाळता येतो. • सापळा पिके घेवून नैसर्गिक शत्रू किडींची संख्याही वाढवता येते. • मुख्य पिकाच्या पेरणीच्या वेळीच सापळा पिकाची लागवड करावी. • सापळा पिकांवर कोणत्याही कीटकनाशकाची फवारणी करू नये. • सापळा पिकांमध्ये पीक लागवडीच्या आवश्यक पद्धतींचे नियमित पालन करावे. • कोबी, फ्लॉवर इत्यादी कोबीवर्गीय पिकांमध्ये दर २५ ओळींनंतर एक ओळ मोहरी पिकाची घेऊन आपण या पिकातील चौकोनी ठिपक्याच्या पतंग (डायमंड बॅक मॉथ) या किडीची तीव्रता कमी करू शकतो. तसेच मावा किडींची देखील संख्या कमी होऊ शकते. • कापूस किंवा टोमॅटोच्या शेताच्या चारी बाजूने एक किंवा दोन झेंडूच्या ओळी लावाव्या. तसेच दर मुख्य पिकाच्या १० ओळींनंतर झेंडूची एक ओळ लावावी. परिणामी, फळ पोखरणाऱ्या अळीची मादी पतंग कापूस / टोमॅटो ऐवजी झेंडूच्या फुलांवर अंडी घालते. कालांतराने हि झेंडूची परिपक्व फुलांची काढणी करावी. • कापूस किंवा भुईमुग पिकाला इजा करणाऱ्या पाने खाणाऱ्या अळीपासून संरक्षण करण्यासाठी पिकाच्या चारी बाजूने एरंड पिकाची लागवड करावी. एरंडच्या पानांबरोबरच वेळोवेळी पाने खाणाऱ्या अळीची अंडी गोळा करुन नष्ट करावीत. • लष्करी अळीमुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी मका पिकाच्या चारी बाजूने नेपियर गवत वाढवावे. • केसाळ अळीमुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी भुईमूग, सोयाबीन आणि चवळी पिकाच्या सभोवताल सन-हेम्पची पेरणी करावी.
• संदर्भ – अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सिलेंस हा उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना नक्कीच शेअर करा!
39
0
इतर लेख